OBC Reservation : ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यास मध्यप्रदेश धर्तीवर परवानगी मिळणार? भुजबळ म्हणतात कोर्टाला विनंती करणार…

आपल्यालासुध्दा सुप्रीम कोर्टाकडे आमचं आरक्षण मध्यप्रदेशचा जसा रिपोर्ट आला त्याचधर्तीवर आमचाही रिपोर्ट आला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार आहोत.त्यामुळे त्याच धर्तीवर परवानगी मिळायला अडचण येणार नाही अशी महत्त्वपूर्ण माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यास मध्यप्रदेश धर्तीवर परवानगी मिळणार? भुजबळ म्हणतात कोर्टाला विनंती करणार...
छगन भुजबळ, नाशिक पालकमंत्रीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 3:59 PM

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा सुप्रिम कोर्टात आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारला पुन्हा दणका देत, आरक्षणाशिवाय निवडणुका (Election 2022) घेण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. बांठिया आयोगही अतिशय चांगलं काम करत आहे. त्यांना आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सरकारच्यावतीने मुख्य सचिव व इतरही मंडळी अभिप्रेत असलेला डाटा गावागावातून गोळा करत आहे. मध्यप्रदेशने जे गोळा केले तसेच त्यांनी करावं आणि अधिक चांगलं करता येईल ते करावं. पंधरा – वीस दिवसात आयोगाचं काम संपावं अशी अपेक्षा आहे. ते काम संपल्यावर आपल्यालासुध्दा सुप्रीम कोर्टाकडे आमचं आरक्षण मध्यप्रदेशचा जसा रिपोर्ट आला त्याचधर्तीवर आमचाही रिपोर्ट आला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार आहोत.त्यामुळे त्याच धर्तीवर परवानगी मिळायला अडचण येणार नाही अशी महत्त्वपूर्ण माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

पावसाळ्यात निवडणूका घेणे कठीण

आता निवडणूक आयोग आपलं काम करत असल्याची कल्पना आहे. अजून निवडणूक आयोगाचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर एक ते दीड महिन्याची प्रक्रिया असून हा पावसाचा हंगाम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला पावसाळ्यात निवडणूका घेणे कठीण जाणार आहे अशी विनंती केली आहे. असेही ते म्हणाले.आज जनता दरबार उपक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहिले असता माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली. आता ज्या जनरल जागा सुटलेल्या त्या मान्य झाल्यानंतर त्यामध्ये ओबीसी आरक्षण येईल. स्री – पुरुष आरक्षण हे नेहमीच असते. पुरुषांचेही आरक्षण नेहमीच आहे. एसटी, एससी आरक्षण नेहमीचं आहे. त्यावेळी ओबीसी आरक्षण असतेच. त्यामुळे तसंच हे आरक्षण होणार. त्यात अवघड काय आहे असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.

ओबीसीचा डाटा हवा

निवृत्त सचिव असतील किंवा मुख्य सचिव असतील त्यांच्यात विचारांचं घर्षण होत असतंच. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना हवी ती माहिती देत आहोत. सरकार पूर्णपणे सहकार्य करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यामुळे चर्चा करणं म्हणजे फार मोठे मतभेद होणं असं नाही. चर्चा करत असतील. आमच्यात समन्वय आहे. ओबीसीचा डाटा हवा आहे बाकीचा कुणाचा डाटा आवश्यक नाही असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

आमचा हक्काचा वेळेवर द्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीवर ट्वीट केले आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी जीएसटीचा परतावा सगळाच द्या ना… तुम्हाला दोन महिन्याचा पगार दिला आणि दोन महिन्याचा पगार रखडला आणि एक महिन्याचा दिला तर दोन महिन्याचा पगार देणार नाही का? आमचा हक्काचा जीएसटी आहे तो द्या ना आणि तो वेळेवर द्या. सगळा आमचा जो जीएसटी आहे जो हक्क आहे जो काही वीस – पंचवीस हजार कोटी रुपये गोळा करता तो आम्हाला देऊन टाका ठेवता कशाला असा रोखठोक सवालही छगन भुजबळ यांनी केंद्रसरकारला केला.

दहा रुपये कमी करणे हा कुठला न्याय

केंद्राने जीएसटी सोडून द्यावा आणि आम्हाला सांगावं की, जीएसटी संपली तुम्ही सेलटॅक्स गोळा करा मग प्रश्न येणार नाही तुमच्याकडे बोट दाखवण्याचा. सेलटॅक्स ऐवजी जीएसटी गोळा करता ते पैसे राज्याला मिळाले पाहिजे. राज्यासाठी गोळा होतात. 50 रुपयाचे पेट्रोल सव्वाशे रुपये करायचे आणि दहा रुपये कमी करायचे हा कुठला न्याय. सगळे कपडे काढून घ्यायचे आणि लंगोट द्यायची आणि म्हणायचं हे घ्या.. अरे पण आमचे बाकीचे कपडे द्या ना असा उपरोधिक टोलाही छगन भुजबळ यांनी केंद्रसरकारला लगावला.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.