AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किडन्या विकून पैसे देतो पण ठाकरेंची साथ… ओमराजेंना शिवसैनिकांचे कळकळीचे आवाहन, निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Omraje Nimbalkar : धाराशिवमधील काही कार्यकर्त्यांनी ओमराजेंना उद्धव ठाकरेंची साथ सोडू नये अशी विनंती केली आहे. तर काहींनी सत्तेसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

किडन्या विकून पैसे देतो पण ठाकरेंची साथ... ओमराजेंना शिवसैनिकांचे कळकळीचे आवाहन, निर्णयाकडे राज्याचे लक्ष
Omraje Nimbalkar news Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 21, 2026 | 7:04 PM
Share

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्याचे बातम्या समोर आल्या आहेत. कारण पक्षाच्या बैठकीला ओमराजे गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा समोर आल्या आहेत. मात्र ओमराजेंनी आपण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. सध्या ओमराजे धाराशिवमध्ये असून ते कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत. अशातच आता काही कार्यकर्त्यांनी ओमराजेंना उद्धव ठाकरेंची साथ सोडू नये अशी विनंती केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किडन्या विकून पैसे देतो पण ठाकरेंची साथ सोडू नका

शिवसेनेच्या खासदारांना पक्षांतरासाठी पैसे दिले जात असल्याचे समोर आले होते. यावर बोलताना उमरगा तालुक्यातील शिवसैनिकांनी म्हटले की, किडन्या विकून पैसे देतो पण पैशासाठी पक्ष बदलू नका. समोरचे लोक तुम्हाला शंभर कोटी रुपये देतो म्हणत असतील, तर आम्ही आमच्या किडन्या विकून तुम्हाला शंभर कोटी रुपये जमा करून देतो. उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकही शिवसैनिक उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून जाणार नसल्याचा ठराव घेतला आहे. आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी रक्ताचे पाणी केलं. आम्ही तुम्हाला इथून पुढे कधीच विकास निधी मागणार नाहीत, परंतु तुम्ही पक्ष सोडू नका, असं या शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

ओमराजेंनी सत्तेसोबत जावे…

दुसरीकडे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांनी सत्तेसोबत जावं असं म्हटलं आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. ओमराजेंनी एकनाथ शिंदे गटात जावे असे आम्हाला वाटते. तसेच खासदार निंबाळकरांना मंत्रीपद मिळायला पाहिजे. धाराशिव जिल्ह्याला एकदाही केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही. प्रत्येक कामात आमच्या मतदारांना, कार्यकर्त्यांना अडवणूक केली जातेय. त्यामुळे आपल्याला लोकांची कामे करायची असतील तर सत्तेत जावे लागेल यात शंका नाही असं या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यात ठाकरे गटाचे नेते कैलास पाटील आणि खासदार अरविंद सावंत यांचे निकटवर्तीय नेते वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडी, खासदारांच्या बंडखोरीचा मुद्दा आणि ओमराजे यांच्या पुढील भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर ओमराजेंनी आपण मतदारसंघात जाऊन निर्णय घेणार असल्याची माहिती दिली होती.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन