AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे फक्त एक आमदार, मंत्री नाहीत तर…; करुणा शर्मांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

करुणा शर्मा यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल सुरूच आहे, आता आज बोलताना त्यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

धनंजय मुंडे फक्त एक आमदार, मंत्री नाहीत तर...; करुणा शर्मांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
karuna sharma
| Updated on: Mar 03, 2025 | 2:57 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, करुणा शर्मा यांनी आता मंत्री धनंजय मुंडेंबाबत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शंभर टक्के दोन दिवस अगोदरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं दोन दिवसानंतर आम्ही ठरवू असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर पार्टीमध्ये दबाव आहे, मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही, अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचं आणि स्वत:च्या पक्षातील आमदार, खासदारांचं किती प्रेशर येतं?  ही गोष्ट थांबवता येऊ शकते का? हे पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला मंत्रालयातून माहिती मिळाली आहे, माझे काही लोक आहेत, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आहे. सर्वांना माहिती आहे, धनंजय मुंडे हे छोटा मोठा आमदार किंवा मंत्री नाहीत, जो अजितदादा गट आहे, तो अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. त्यामुळे स्वत:च्या पक्षात स्वत:ची चालणार. पक्ष त्यांचा आहे मी एवढ्या वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे, मला सर्व माहिती आहे. त्यामुळे मी हे सगळं ठोकपणे सांगते.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची कोणात ताकद नाही, मात्र सध्या जे प्रेशर वाढत चाललं आहे, त्यासाठी त्यांचा राजीनामा दोन दिवसापूर्वी अजितदादा यांनी घेतला आहे.  मात्र त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, दोन दिवसांनंतर आम्ही या गोष्टीवर निर्णय घेणार आहोत, त्यामुळे ही गोष्ट आता दोन दिवस पुढे  ढकलेली आहे.

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी निवेदन दिलेलं आहे, मात्र त्यांनी मला आतापर्यंत भेटीसाठी वेळ दिला नाही. आता मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी पत्र देत आहे, त्याचबरोबर विधानभवनात जाण्याचाही प्रयत्न करणार आहे. माझी रोखठोक भूमिका आहे,  त्यामुळे मला तिकडे जाऊ देणार नाहीत. मात्र त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे,  आणि देवेंद्र फडणीस यांना भेटण्याचाही प्रयत्न करणार आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अंजली दमानिया, सुरेश धस या सगळ्यांसोबत मिळून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात असे लोक  मंत्रालयात नको यासाठी महाराष्ट्राला जागृत करणार आहोत, असंही यावेळी करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?