AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : असा प्रश्न विचारला की संजय राऊत चिडले, पत्रकारांना सरळ बोलले ‘प्रश्न विचारा, तु्म्ही उलट तपासणी नाही घ्यायची’

Sanjay Raut : "ईडी, सीबीआय आमच्या हातात असती, तर आम्हालाही धाक ठेवता आला असता. सीबीआय, ईडी हा मोदी, अमित शाह यांचा धाक आहे. उद्या सत्तेवर नसाल तर कुठला तुमचा धाक" असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut : असा प्रश्न विचारला की संजय राऊत चिडले, पत्रकारांना सरळ बोलले 'प्रश्न विचारा, तु्म्ही उलट तपासणी नाही घ्यायची'
Sanjay Raut
| Updated on: Jun 16, 2026 | 10:25 AM
Share

उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार, ते वेगळा गट स्थापन करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या आहेत. काल दिल्लीत उद्धव ठाकरे गटाच्या एका खासदाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्याची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांनी जोर पकडला. आज सजंय राऊत या विषयावर पत्रकारांशी बोलले. “तृणमुल काँग्रेसचा विषय पाहतोय. तृणमुलचे 20-22 खासदार गेले. आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश झालाय. याला तुम्ही भाजपची हाव म्हणणार. पण शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही देत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत” असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कार्य पद्धतीवर या खासदारांची नाराजी आहे या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत यांनी “असं त्यांनी कधी कोणाला सांगितलं?” असं विचारलं. “शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे यांच्याइतका लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधींना भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंबद्दल तुम्हाला जे सांगतात, तशी तक्रार कोणी केलेली नाही. ग्रामीण भागातले खासदार मुंबईत आले की, उद्धव ठाकरेंना भेटतात. विधिमंडळ काळात आमदारा उद्धव ठाकरेंना भेटतात. तुमच्यापर्यंत आलेली बातमी चुकीची आहे. या क्षणी एवढच सांगेन शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत” असं संजय राऊत म्हणाले. “ईडी, सीबीआय आमच्या हातात असती, तर आम्हालाही धाक ठेवता आला असता. सीबीआय, ईडी हा मोदी, अमित शाह यांचा धाक आहे. उद्या सत्तेवर नसाल तर कुठला तुमचा धाक” असं राऊत म्हणाले.

त्यात एवढी आतडी पिळवटून विचारण्याची गरज काय?

खासदार माध्यमांना न भेटता मागच्या दाराने निघून जातात. पक्ष नेतृत्वाने बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही पक्षाच्या बैठकीला पोहोचत नाही पण दिल्लीत मंत्र्याच्या भेटीला जाता या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत चिडले. “तुम्ही उलट तपासणी घेताय का?. प्रश्न विचारा, तु्म्ही उलट तपासणी नाही घ्यायची. पत्रकारांचे प्रश्न पत्रकारांसारखे विचारा. एक खासदार एका मंत्र्याला भेटला, त्यात एवढी आतडी पिळवटून विचारण्याची गरज काय?” असा उलटा सवाल राऊत यांनी केला. “उद्या मी पंतप्रधानांना भेटेन माझ्या कामासाठी. एखादं राष्ट्र हिताचं काम असेल तर पंतप्रधानांना मी भेटू शकतो. पंतप्रधान,मंत्री देशाचे आहेत, कुठल्या पक्षाचे नाहीत” असं बचाव करताना राऊत बोलले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी