AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्धापन दिनालाच मोठा गेम? शक्तीप्रदर्शन आणि… शिंदे सेनेत मोठ्या हालचाली तर ठाकरेंचा प्लान काय?

राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू असून, ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला केवळ ४ खासदार हजर राहिल्याने चिंता वाढली आहे. शिंदे गट वर्धापन दिनानिमित्त शक्तीप्रदर्शन करणार असून, सर्वांचे लक्ष १९ जून रोजी होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आहे.

वर्धापन दिनालाच मोठा गेम? शक्तीप्रदर्शन आणि… शिंदे सेनेत मोठ्या हालचाली तर ठाकरेंचा प्लान काय?
वर्धापन दिनालाच मोठा गेम होणार ?
| Updated on: Jun 16, 2026 | 9:58 AM
Share

गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू आहे. एकीकडे शिंदे गटात इनकमिंगचा सिलसिला कायम असतानाच ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार हेही उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ऑपरेशन टागरच्या चर्चांचा जोर आणखीनच वाढला आहे. लवकरच उद्धव ठाकरेंच्या गटाला पुन्हा मोठा धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. हे ऑपरेशन टायगर नेमकं कधी होणार याची काही निश्चित तारीख समोर आलेली नसली तरीही सतत सुरू असणाऱ्या चर्चांमुळे ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. त्यातच रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी ठाकरे गटाचे फक्त 4 खासदार आले होते, तर 5 जण गैरहजर होते, त्यामुळेही ठाकरे गटाची चिंता वाढली असून खासदार कधीची फुटू शकतात अशी धास्ती त्यांना आहे.

दरम्यान शिवसेनेचा वर्धापन दिनही जवळ आला असून येत्या 19 जून रोजी शिवसेना 60 वर्ष पूर्ण करणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींनाही वेग आला असून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट वर्धापन दिनाच्या जय्यत तयारीत व्यस्त आहेत.

शिंदे सेनेकडून मोठ्या हालचाली

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मुंबईत मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार असून त्यासाठी तयारीला वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी मुंबईतील शिवसेनेचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांची एकत्रित बैठक पार पडली. शिंदे गटाच्या या बैठकीत, शिवसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे, त्यासाठी आमदार आणि नगरसेवकांवर देखील विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

यंदाच्या वर्धापन दिनी जिल्हा परिषद, विधान परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मात्र, असं असलं तरी सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते ‘ऑपरेशन टायगर’कडे, राजकीय वर्तुळातही याबद्दलच सर्वाधिक चर्चा रंगली आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार का, याच दिवशी शिंदे गट ठाकरे गटाला धक्का देत गेम करणार का, अशा चर्चांना, अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं असून ,सर्वांचं लक्ष तिथेच एकवटलं आहे.

ठाकरे गटाचा प्लान काय ?

एकीकडे शिंदे गटाकडून वर्धापन दिनानिमित्त शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असतानाच, दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचा गटही 60 व्या वर्धापन दिनासाठी सज्ज आहे. शिवसेनेचा हा हिरक महोत्सवी वर्धापन दिन, शुक्रवार 19 जून रोजी मुंबईत मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांवर आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात, ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी