हिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांचा धक्कादायक निर्णय, सत्ताधाऱ्यांची होणार मोठी अडचण!

सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. यंदाचे अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता विरोधकांनी मोठा निर्णय घेतला आहे.

हिवाळी अधिवेशनाआधी विरोधकांचा धक्कादायक निर्णय, सत्ताधाऱ्यांची होणार मोठी अडचण!
MAHARASHTRA ASSEMBLY WINTER SESSION
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 3:02 PM

Maharashtra Assembly Winter Session : राज्यात सध्या अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार अशा मुद्द्यांमुळे राज्य सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. सरकारवर सडकून टीका केली जात आहे. सरकार एकीकडे कात्रीत पकडले गेलेले असताना सोमवारपासून म्हणजेच 8 डिसेंबरपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होणार आहे. एकूण सात दिवसांचे हे अधिवेशन असेल. त्यामुळे हे अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे, शेतकरी कोलमडला आहे असा आरोप करत अधिवेशनापूर्वीच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला आहे. आम्ही चहापानाला जाणार नाही, असे विरोधकांनी म्हटले आहे.

विरोधकांचे सरकारवर गंभीर आरोप

विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर थेट बहिष्कार टाकला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तशी माहिती दिली. सरकारला चर्चा नको आहे. त्यांना फक्त लोकांना फसवायचं आहे. भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ आहे. राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही. सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. सरकारने अर्धं राज्य विकलांग केलं आहे. सर्व मंत्री त्यांच्या खात्याचे कंत्राटदार झाले आहेत, असा आरोपही केला आहे.

विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व्हावी

सत्ताधारी आमदारांना हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातो. विरोधी बाकावरील आमदारांच्या मतदारसंघांसाठी मात्र निधी दिली जात नाहीये. हे अधिवेशन विदर्भात होत आहे. त्यामुळे यावेळी विदर्भातील प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण सरकार विदर्भाताली प्रश्नांवर चर्चाच करायला तयार नाही, अशी घाणाघाती टीकाही भास्कर जाधव यांनी केला.

विजय वडेट्टीवार यांनी ओढले टीकेचे आसूड

त्याआधी विजय वडेट्टीवार यांनी तर सरकारकडून कंत्राटामध्ये कसा घोळ घातला जात आहे. बेरोजगारी कशी वाढली आहे, शेतकरी कसा हवालदील आहे याची विस्त्रत माहिती दिली
आहे. दरम्यान, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्यामुळे आता यावेळचे हिवाळी अधिवेशन तेवढेच वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.