AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये 45 टन सोयाबीनचे बोगस बियाणे, 60 लाखांच्या बियाण्यांसह चाळीस लाखांचा ट्रक जप्त

या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या बनावट बियाण्याच्या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडालीय.

नांदेडमध्ये 45 टन सोयाबीनचे बोगस बियाणे, 60 लाखांच्या बियाण्यांसह चाळीस लाखांचा ट्रक जप्त
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 13, 2023 | 4:05 PM
Share

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे साठ लाख रुपये किंमतीचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त करण्यात आलंय. तसेच चाळीस लाख रुपये किमतीच्या ट्रकसह हे बियाणे जप्त करण्यात आलंय. नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे सोयाबीनचे बनावट बियाणे तयार करून ते विक्रीसाठी नेले जात होते. गोदावरी सिडस अँड बायोटेक या नावाने हे बनावट बियाणे आढळून आले. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करत जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या बनावट बियाण्याच्या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडालीय.

बोगस बियाण्याच्या या धंद्यात अनेक बड्या मंडळींचा सहभाग असल्याची माहिती मिळतेय. बोगस बियाणे विक्रीचा कोलंबी गावातील जुनाच धंदा असल्याचे गावकऱ्यानी सांगितलंय. शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील या कंपनीच्या बनावट बियाण्याची तक्रार केली होती. मात्र अधिकाऱ्यांना हाताशी धरून या कंपनीने आपल्यावर कारवाई होऊ दिली नव्हती. मात्र आता थेट तालुका कृषी अधिकाऱ्याने पाळत ठेवत ही कारवाई केल्याने कृषी अधिकाऱ्यांचे कौतुक होतंय.

शेतकऱ्यांना नागवणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी

मराठवाडा आणि विदर्भात खरीप हंगामात सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास सत्तर टक्केच्या आसपास आहे. त्यामुळे बाजारात विक्रीला जाणारे हे बनावट 45 टन सोयाबीन पेरल्या गेले असते तर हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसला असता. सध्या तरी हे बियाणे नेमकं कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होते, याची माहिती मिळू शकली नाही.

मात्र पोलिसांनी कसून तपास केला तर या मागचे सूत्रधार तुरुंगाआड जातील. पण पोलीस तपासावर दबाव असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे गोरगरीब आणि काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कुणी वाली आहे की नाही असा सवाल विचारल्या जातोय.

सोयाबीन असो की, इतर कोणतेही बियाणे खरेदी करताना सावध राहण्याची वेळ आली आहे. बोगस कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत. त्यामुळे घरी बियाणे तयार करणे केव्हाही चांगले. फसवणूक झाल्यानंतर ओरडत बसण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...