Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai News : पतीसोबत बुलेटवरुन तुंगारेश्वर दर्शनाला गेली होती, दर्शन घेऊन घरी परतत असतानाच ओढणीने केला घात

श्रावण महिना सुरु असल्याने रविवारी सुट्टीनिमित्त पती-पत्नी बुलेटवरुन तुंगारेश्वर येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र त्यांनंतर त्यांचे हे एकत्र दर्शन शेवटचे ठरले.

Vasai News : पतीसोबत बुलेटवरुन तुंगारेश्वर दर्शनाला गेली होती, दर्शन घेऊन घरी परतत असतानाच ओढणीने केला घात
वसईत बुलटेमध्ये ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 8:25 AM

वसई / 22 ऑगस्ट 2023 : वसईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सध्या श्रावण महिना सुरु आहे. यामुळे अनेक भाविक वसईतील तुंगारेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पण दर्शनाला आलेल्या एका महिलेसोबत हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पतीसोबत बुलेटवर बसून तुंगारेश्वर दर्शनाला गेलेल्या पत्नीचा ओढणीने घात केला. बुलेटवरुन जात असताना महिलेची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकल्याने गळफास बसून तिचा मृत्यू झाल्याची धक्क्दायक घटना घडली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. प्रतिमा यादव असे मयत महिलेचे नाव असून, ती कांदिवलीतील रहिवासी आहे. या घटनेमुळे कांदिवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तुंगारेश्वरहून महादेवाचे दर्शन घेऊन परतत होते

कांदिवलीतील रहिवासी असलेले यादव पती-पत्नी रविवारी सुट्टी असल्याने वसईतील तुंगारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. रविवारी पहाटे महादेवाचे दर्शन घेऊन पती-पत्नी बुलेटवरुन कांदिवली येथे घरी परतत होते. कांदिवली पश्चिमेतील ईराणीवाडी येथे यादव दाम्पत्य राहते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत महिलेच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली.

ओढणी चाकात अडकल्यानंतर चाकात गुंडाळत गेली. यामुळे प्रतिमा हिच्या गळ्याला फास बसून ती खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.