Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : नवरीला मेकअप महागात पडला, मेकअप आर्टिस्टच दागिने घेऊन पसार झाल्या !

डोंबिवलीत चोरीची अनोखी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेवरुन नक्की कुणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Kalyan Crime : नवरीला मेकअप महागात पडला, मेकअप आर्टिस्टच दागिने घेऊन पसार झाल्या !
डोंबिवलीत मेकअप आर्टिस्टने नवरीचे दागिने चोरलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 5:49 PM

डोंबिवली / 21 ऑगस्ट 2023 : डोंबिवलीत चोरीच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाहीत. गर्दीचा फायदा घेत, घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढत असतानाच आता चोरीची अनोखी घटना उघडकीस आली आहे. साखरपुड्यासाठी नवरीचा मेकअप करायला आलेल्या मेकअप आर्टिस्टनेच नवरीचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. कल्पना राठोड आणि अंकिता परब उर्फ अंकिता इंगळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेले दागिने हस्तगत केले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुलुंड परिसरात राहणाऱ्या तरुणीचा 15 ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेकडील गार्डा सर्कल येथील हॉलमध्ये साखरपुडा आयोजित करण्यात आला होता. यासाठी तरुणीने आपल्या ओळखीतल्या मेकअप आर्टिस्टला बोलावले होते. तरुणीचा मेकअप झाल्यानंतर मॅचिंग ज्वेलरी घालण्यासाठी तरुणीने सोन्याची चैन आणि कानातले काढून पर्समध्ये ठेवले. यावेळी हातचलाखीने मेकअप आर्टिस्टने ही पर्स उचलून पोबारा केला.

नातेवाईकांना वेळीच लक्षात आल्याने आरोपींना अटक

दागिने चोरी झाल्याचे नातेवाईकांना वेळीच लक्षात आले. नातेवाईकांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हॉलमधील सीसीटीव्ही तपासले असता दोन महिला संशयितरित्या पळताना दिसल्या. पोलिसांनी महिलांचा पाठलाग करत धावडी परिसरातून महिलांना ताब्यात घेतले. महिलांकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.