बँकेने सुट्ट्या रद्द केल्या, मग ऑनड्युटीच गोव्याला पोहचले, पण ती एक चूक केली अन्…

| Updated on: Jun 30, 2023 | 10:54 AM

जिल्हा बँकेने दोन वर्षात शून्य एनपीओ करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली सुरु आहे. यामुळे बँकेकडून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मात्र प्रशासनाचा आदेश जुगारुन पिकनिक करणे काही अधिकाऱ्यांना महागात पडले.

बँकेने सुट्ट्या रद्द केल्या, मग ऑनड्युटीच गोव्याला पोहचले, पण ती एक चूक केली अन्...
ऑनड्युटी पिकनिकला जणाऱ्या आठ बँक अधिकाऱ्यांवर कारवाई
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : बँकेने सुट्ट्या रद्द केल्या असल्याने ऑनड्युटी गोव्याला पिकनिकला जाणे आठ अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वांची बदली केली आहे. मार्केड यार्ड शाखेचे आर.टी. नाटेकर, बी.आर. दुधाळ, उमराणी शाखेतील एस.ए. कांबळे, उमदी शाखेतील एस.एम. सोलनकर, एम.एम. मुल्ला, एम.एम. पाटील, एस.एम. तेली आणि दरीबडची शाखेतील ए.यू. वाघमारे अशी कारवाई झालेल्या आठ अधिकाऱ्यांची नावे आहेत. शिराळा तालुक्यातील बँकेच्या विविध शाखांमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. पिकनिकचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर बँकेने ही कारवाई केली.

कर्जवसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या रद्द केल्या

पुढील दोन वर्षात एनपीए शून्य टक्के करण्याचा निर्धार जिल्हा बँकेने केला असून, यासाठी शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुली सुरु आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाला ओटीएस योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी एकरकमी परतफेड योजना राबवत जून अखेरपर्यंत वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सीईओ शिवाजीराव वाघ यांनी दिले होते. योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाधिक कर्जवसुली व्हावी यासाठी बँकेने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक रजाही रद्द केल्या आहेत.

प्रशासनाचा आदेश जुगारुन गोवा गाठले

बँकेच्या आदेशाप्रमाणे सर्व अधिकारी, कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही काम करत आहेत. असे असताना वरील आठ कर्मचाऱ्यांनी सीईओचा आदेश जुगारुन गोवा गाठले आणि तीन मस्त मजा केली. मात्र एक चूक त्यांना महागात पडली. गोव्याचे पिकनिकचे फोटो त्यांनी बँकेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले. यानंतर हे फोटो सीईओंपर्यंत पोहचले आणि सर्वांना कारवाईला सामोरे जावे लागले. प्रशासनाच्या आदेशानंतरही आठ अधिकाऱ्यांनी गेल्या शनिवारी, रविवारी बँकेला असलेल्या सुटीला लागून एक रजा टाकली आणि गोव्यात गेले.

हे सुद्धा वाचा