AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil | गौतमी पाटील हिचा डान्स आणि फटका मात्र सोसावा लागतोय गरीबाला

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचा अहमदनगरमधील एका दुकानदाराला नाहक त्रास सोसावा लागतोय. गौतमीच्या अदांवर खरंतर हजारो तरुण फिदा होताना दिसतात. पण या दुकानदाराला तिच्या कार्यक्रमामुळे नाहक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.

Gautami Patil | गौतमी पाटील हिचा डान्स आणि फटका मात्र सोसावा लागतोय गरीबाला
| Updated on: Mar 30, 2023 | 8:27 PM
Share

अहमदनगर : ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’, असं गाणं आपण ऐकलं आहे. याशिवाय करतं कोण आणि भरतं कोण, अशी म्हण देखील आपण ऐकली आहे. या गाण्याचा आणि म्हणीचा वेगवेगळ्या परिस्थितीत निघणारा अर्थ मात्र एकच असतो. आपण जी कर्म करतो त्यांची परतफेड आपल्याला इथेच करावी लागतात, असं बोलतात. पण काही गोष्टी त्याला अपवाद असतात. कुणीतरी काहीतरी करुन जातं किंवा कुणामुळे तरी काहीतरी विपरीत घडून जातं आणि त्याचे दुष्परिणाम ज्याचा त्या गोष्टीशी काहीच संबंध नाही त्यांना भोगावे लागतात. बऱ्याचदा अशा प्रकरणांमध्ये ज्यांची बाजू कमकुवत असते त्यांनाच जास्त भोगावं लागतं. म्हणजे ते स्वभावाने गरीब असतात, शांत असतात, त्यामुळे ते हा त्रास सोसून घेतात. काही लोक आपल्याला होणाऱ्या त्रासानंतर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण पदरात निराशाच पडते. असाच काहीसा प्रकार नगरमध्ये बघायला मिळतोय.

नेमकं प्रकरण काय?

विशेष म्हणजे आम्ही ज्या प्रकरणाची माहिती सांगतोय त्याचा संबंध थेट डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यासोबत आहे. आता तुम्ही म्हणाल गौतमी पाटील हिचा काय संबंध? पण थांबा, गौतमी पाटीलचा या प्रकरणात खरंच संबंध आहे की नाही ते तुम्हीच ठरवा. त्याचं झालं असं की, पारनेर तालुक्यात जवळे येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हा कार्यक्रम अयोजिय करण्यात आला होता. गौतमी पाटील कार्यक्रमाला येणार म्हटल्यावर तरुणांची झुंबड उडणार हे साहजिकच आहे. पण याच झुंबडमुळे एका गरीब दुकानदाराला नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे.

डान्सर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी

संबंधित कार्यक्रमात गौतमी नेहमीप्रमाणे चांगलीत थिरकली. प्रेक्षकांनी देखील गौतमी पाटीलच्या अदाकारींवर ठेका धरला. यावेळी प्रेक्षक गौतमीच्या अदाकारींवर बेभान होऊन नाचले. तर काही प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतने बांधलेल्या गाळ्यांवरती चढल्याने एका गाळ्याचा पत्रा फुटला. त्यामुळे गाळाधारकाला मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे या गाळाधारकाची परिस्थिती आधीच बेताची आहे. त्यामुळे त्याने नुकसान भरपाईची मागणी केलीय. पण त्याच्या भरपाईची कुणीही दखल घेईना. त्यांच्या नुकसान भरपाईच्या मागणीकडे पद्धतीशरपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दुकानदाराला विनाकारण गौतमीच्या अदांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.