Vijay Vadettiwar | कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत, चंद्रपुरात 132 महिलांना धनादेश

| Updated on: Mar 18, 2022 | 12:43 PM

सह्याद्री फाउंडेशनने घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या बचत गटातील महिलांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. जिल्ह्यातील दोनशे महिलांना या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकी 30 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. या अर्थसहाय्यातून महिलांना स्वयंरोजगारासाठी छोटा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळणार आहे.

Vijay Vadettiwar | कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत, चंद्रपुरात 132 महिलांना धनादेश
चंद्रपुरात महिलांना धनादेशाचे वितरण करताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार.
Image Credit source: facebook
Follow us on

चंद्रपूर : कोविड-19 मुळे घरातील प्रमुख कर्ता पुरुष गमाविलेल्या महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांना धनादेश वितरण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील नियोजन भवन येथे सह्याद्री फांऊडेशन (Sahyandri Foundation) व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (Women’s Economic Development Corporation) सहकार्याने हा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या आयुष्याची होळी केली. या काळात जिल्ह्यात कोरोनामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. घरातील कर्ता व्यक्ती गमाविल्याने अनेकांचे आयुष्य अंधकारमय झाले. मात्र, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला उभे करण्यासाठी माविमने रोजगाराभिमुख प्रकल्प उभारावे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी या कार्यक्रमात केले. सह्याद्री फाउंडेशनने घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या बचत गटातील महिलांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील दोनशे महिलांना या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकी 30 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. या अर्थसहाय्यातून महिलांना स्वयंरोजगारासाठी छोटा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळणार आहे.

132 महिलांना धनादेशाचे वाटप

कोविड-19 मुळे घरातील प्रमुख कर्ता पुरुष गमाविलेल्या महिला स्वयंसहायता बचतगटातील 132 महिलांना 30 हजार रुपये आर्थिक सहाय्याचे धनादेश वाटप करण्यात आले. कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला उभे करण्यासाठी सह्याद्री फाउंडेशन व महिला आर्थिक विकास महामंडळाने रोजगाराभिमुख प्रकल्प ऊभारावे. कायमस्वरूपी रोजगार महिलांना देता येईल. यासाठी पाहिजे तो निधी उपलब्ध करून दिल्या जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले. कार्पेट निर्मितीचे मोठे युनिट जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू आहेत. ब्रह्मपुरी येथे गारमेंट क्लस्टर तर सावली येथे कार्पेट क्लस्टर सुरू करण्यात आले आहे. अशा ठिकाणी या महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. काही महिलांना स्वयंरोजगारासाठी महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितलं.

रोजगार प्रकल्प उभारावे

कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या आयुष्याची होळी केली. या काळात जिल्ह्यात कोरोनामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. घरातील कर्ता व्यक्ती गमाविल्याने अनेकांचे आयुष्य अंधकारमय झाले. मात्र, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला उभे करण्यासाठी माविमने रोजगाराभिमुख प्रकल्प उभारावे. महिलांनी खचून न जाता या संकटातून सावरून पुढे जावे. आता या संकटातून बाहेर पडलो आहो, कोरोनाची लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, सह्याद्री फाउंडेशनचे विजय क्षीरसागर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी नरेश उगेमुगे, प्रकाश देवतळे, रामू तिवारी आदी उपस्थित होते.

Chandrapur Crime | मुलाचा राग काढला बापावर, कुऱ्हाडीने पाडला मुडदा, न्यायालयाने सुनावली जन्मठेप

Chandrapur Crime | मुलाचा राग काढला बापावर, कुऱ्हाडीने पाडला मुडदा, न्यायालयाने सुनावली जन्मठेप