AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुळ्यातील झोतवाडे येथे दुसऱ्यांदा आढळला 8 फुटाचा अजगर

शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे येथील शेतकरी गुलाब बंडु सदाराव यांचे शेतातील विहीरीत साधारण 8 फुटाचा अजगर आढळून आल्याची घटना घडली आहे. तसेच 10 दिवसांपूर्वी त्यांच्याच विहिरीत 6.5 फुटाचा अजगर आढळून आला होता. मात्र, त्याला शिताफीने पकडण्यात आले होते.

धुळ्यातील झोतवाडे येथे दुसऱ्यांदा आढळला 8 फुटाचा अजगर
Dhule Python
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 11:18 AM
Share

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे येथील शेतकरी गुलाब बंडु सदाराव यांचे शेतातील विहीरीत साधारण 8 फुटाचा अजगर आढळून आल्याची घटना घडली आहे. तसेच 10 दिवसांपूर्वी त्यांच्याच विहिरीत 6.5 फुटाचा अजगर आढळून आला होता. मात्र, त्याला शिताफीने पकडण्यात आले होते.

या 8 फुटाच्या अजगराला चेतन रावल आणि शोएब मन्यार यांनी जीवदान दिले. तेही खोल विहीरीत उतरून.

वन्यजीव सरंक्षण संस्था नंदुरबार आणि नेचर कंझर्वेशन फोरम एनजीओचे सदस्य सर्प मित्र चेतन रावल आणि शोएब मन्यार राहणार दोंडाईचा यांनी विहीरीत पडलेल्या अजगराला जिवदान दिले. झोतवाडे तालुका शिंदखेडा येथील शेतकरी गुलाब बंडु सदाराव यांचे शेतातील विहीरीत साधारण पहिला 6.5 फुटाचा अजगर आढळून आला होता. तर दुसरा अजगर 8.5 फुटाचा होता.

शिंदखेडातील सर्प मित्रांना दुसरा अजगर पकडण्यात यश आला आहे. दोंडाईचा येथील सर्पमित्र शोएब मन्यार आणि चेतन रावल याच्या मार्गदर्शनाखाली बोलावले. सर्पमित्र शोएब मन्यार याने विहीरीत ऊतरुन भल्या मोठ्या अजगराला शिताफीने पकडून पिशवीत जेरबंद केले. चेतन रावल याने सहकार्य केले.

अजगराचे वय साधारणतः 4 ते 5 वर्ष आहे. अजगराला बाहेर काढून वन विभागाच्या सर्प मित्रांनी वनमजुर दोंडाईचा यांच्या उपस्थितीत दुसरा अजगरास त्यांचे अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

कोळ्यांच्या जाळ्यात 6 फुटी अजगर अडकला

मालाडमधील पाम बिच रिसॉर्टमध्ये नुकतीच एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. मालाडमधील बिच रिसॉर्टच्यामागे कोळ्यांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात 6 फुटी अजगर अढळल्याने नागरिकांच्यात एकाच खळबळ उडाली. हा अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यात सुटण्याचा खूप प्रयत्न करात होता. 10 ते 12 किलोच्या अजगराची लांबी आणि ताकद पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना गोराईमधील शेफाली चौकाजवळ घडली.

अजगर अडकल्याची माहिती Sarp Foundation या गोराईतील सेवाभावी संस्थेला मिळाली. ही संस्था बऱ्याच वर्षापासून मुंबई परिसरातून साप व इतर पशू पक्षी वाचवण्याचे काम करीत आहेत. या संस्थेतील जयवंत दुखंडे यांना त्याचे सहकारी दिनेश मोरे आणि विराज यांना या अजगराबद्दल माहिती दिली. या सर्प मित्रांनी आणि गोराई पोलिसांनी वेळेत जागेवर पोहचून त्या भल्यामोठ्या 8 फुटी अजगराला कोळ्यांच्या नायलॉनच्या जाळ्याला कापून सुरक्षित सोडवले. जर अजगराला वेळीच सोडवले नसते तर सुटण्याच्या प्रयत्नात नायलॉनच्या धाग्याने त्याला खोलवर जखमा झाल्या असत्या.

संबंधित बातम्या :

शेतात घुसलेल्या अजगरावर कुऱ्हाडीचे वार, तडफड पाहूनही गावकऱ्यांना पाझर फुटला नाही

Video | भर रस्त्यावर आला 10 फुटांचा अजगर, भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचं पुढे काय झालं ?

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.