मला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो.. : अण्णा हजारे

| Updated on: Aug 23, 2021 | 1:06 PM

पारनेरच्या तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तहसीलदार देवरे मॅडम यांना दिला.

मला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो.. : अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार नीलेश लंके आणि तहसीलदार ज्योती देवरे
Follow us on

अहमदनगर : आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातल्या वादावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केलं आहे. मला या दोघांच्याही भांडणात मध्ये पडायचं नाही पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो की आत्महत्येसारखा विचार बरा नाही, हा विचार डोक्यातून काढा, असा सल्ला त्यांनी तहसीलदार देवरे यांना दिला.

अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप महिला तहसीलदार यांनी केले होते.

काय म्हणाले अण्णा हजारे?

या आपापसातल्या भांडण मला पडायचं नाही. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी या संबंधी काही बोलणार नाही. फक्त तहसीलदार मॅडमला सांगतो तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त आत्महत्या डोक्यातून काढा, असा सल्ला अण्णा हजारे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना दिला आहे.

इंदोरीकर महाराजांकडून लंकेंवर स्तुतीसुमने

“कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,” अशा शब्दांत प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसेच चांगले काम करताना त्रास होतोच. मात्र, कोरोनातून बरा होणारा प्रत्येक रुग्ण लंके यांना आशीर्वाद देतोय, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) लंके यांचं कौतुक केलं.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर उभारलेले आहे. या कोविड सेंटरमध्ये सध्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन पार पडले.

या कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी लंके यांचे कौतुक करत त्यांना अनेक सल्ले दिले. “चांगले काम करताना त्रास होतोच. यात कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा. पुढील पंचवीस वर्षे तुम्हाला धोका नाही,” असे इंदोरीकर महाराज म्हणाले.

(Anna Hazare Comment On Nilesh Lanke And tehsildar Jyoti Deore Controvercy)

हे ही वाचा :

महिला तहसीलदाराच्या आरोपानं लंके चक्रव्युहात, इंदोरीकर महाराज म्हणतात, कुत्रे भुंकले तरी हत्ती चालत राहतो