अहमदनगरमध्ये महिलेने शेतात सापडलेला जुना बॉम्ब मुलाकडे दिला, अन पुढे जे झालं त्यानं नगर हादरलं

| Updated on: Apr 30, 2021 | 7:28 PM

अहमदनगर जिल्ह्यात नारायणडोह गावाजवळील एका वस्तीच्या रस्त्यावर जुन्या काळातील बॉम्बचा स्फोट झालाय.

अहमदनगरमध्ये महिलेने शेतात सापडलेला जुना बॉम्ब मुलाकडे दिला, अन पुढे जे झालं त्यानं नगर हादरलं
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात नारायणडोह गावाजवळील एका वस्तीच्या रस्त्यावर जुन्या काळातील बॉम्बचा स्फोट झालाय. या स्फोटात एक महिला आणि तरुण दोघेजण जखमी झाले आहेत. बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुमात पिन असणारा हॅन्ड ग्रेनेड मिळाला (Blast of old bomb in Ahmednagar farm after hitting it on ground by Child).

गवत काढण्यासाठी आलेल्या महिलेला शेतात बॉम्ब सापडला

शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या एका महिलेस बॉम्ब गोळा सापडला. त्या महिलेने तो बॉम्ब गोळा जवळ असणाऱ्या मुलाकडे दिला. त्या मुलाने तो बॉम्बगोळा जमीनीवर आपटला. यावेळी मोठा स्फोट झाला. यात शेतात कामावर असणारा अक्षय साहेबराव मांडे हा मुलगा व शेत मालकाची पत्नी मंदाबाई फुंदे दोघे जखमी झाले.

स्फोटाचा आवाज आजूबाजूचा 2-3 किमी परिसरात

या बॉम्बच्या स्फोटाचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत गेल्याने परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पोलीस पथकासह भेट दिली. यानंतर गुरुवारी घटनास्थळाची बॉम्ब शोधक पथकाने पाहणी केली.

हेही वाचा :

जालन्यात जिलेटीन स्फोट, दोन चिमुकले 10 फूट हवेत उडाले

पुण्यात वनविभागाच्या कार्यालयात 70 ते 80 स्फोटकं फुटली!

नक्षलवाद्यांनी पेरलेले बॉम्ब घरी आणले, खेळणे म्हणून खेळताना स्फोट

व्हिडीओ पाहा ;

Blast of old bomb in Ahmednagar farm after hitting it on ground by Child