जालन्यात जिलेटीन स्फोट, दोन चिमुकले 10 फूट हवेत उडाले

जालना : जिलेटीन स्फोटात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना जालन्यात घडली आहे. अबंड तालुक्यातील वलखेडामधील ही घटना आहे. शिवम धोत्रे (9) आणि शिवराज धोत्रे (7) अशी या दोघांची नावं आहेत. या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त होत आहे. जालन्यातील अबंड तालुक्यात काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खाणीवर रवींद्र धोत्रे व त्यांची पत्नी दगड फोडण्याचे काम […]

जालन्यात जिलेटीन स्फोट, दोन चिमुकले 10 फूट हवेत उडाले
Follow us
| Updated on: May 22, 2019 | 10:29 AM

जालना : जिलेटीन स्फोटात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना जालन्यात घडली आहे. अबंड तालुक्यातील वलखेडामधील ही घटना आहे. शिवम धोत्रे (9) आणि शिवराज धोत्रे (7) अशी या दोघांची नावं आहेत. या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त होत आहे.

जालन्यातील अबंड तालुक्यात काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खाणीवर रवींद्र धोत्रे व त्यांची पत्नी दगड फोडण्याचे काम करतात. काल (21 मे) रवींद्र धोत्रे हे आपल्या दोन्ही मुलांसोबत दगडीच्या खाणीजवळ गेले होते. दुपारी रणरणतं ऊन असल्याने ते दोघेही दगडाच्या खाणीजवळ बसले होते. मात्र त्याचदरम्यान अचानक जिलेटीनचा स्फोट झाला. या स्फोटामुळे खाणीजवळ टेकून बसलेले शिवम आणि शिवराज दोघेही दहा फूट अंतरावर उडाले. हा स्फोट इतका तीव्र होता की, या दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने रवींद्र धोत्रे व त्यांची पत्नी खाणीजवळील ट्रॅक्टरच्या दुसऱ्या बाजूला दगड भरण्याचे काम करत असल्याने त्यांचा जीव वाचला

धोत्रे कुटुंब हे बीडमधील गेवराई तालुक्यातील संगम जळगाव या गावात राहतात. गेल्या दोन महिन्यापासून ते काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या जालन्यातील अबंड तालुक्यातील वलखेडा शिवारात दगड खाणीवर दगड फोडण्याचे काम करतात.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसंच दोन्ही बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.