पुण्यात वनविभागाच्या कार्यालयात 70 ते 80 स्फोटकं फुटली!

मुळशीतील वन विभागाच्या कार्यालयात तब्बल 70 ते 80 स्फोटकांचा स्फोट झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पुण्यात वनविभागाच्या कार्यालयात 70 ते 80 स्फोटकं फुटली!


पुणे : मुळशीतील वन विभागाच्या कार्यालयात तब्बल 70 ते 80 स्फोटकांचा स्फोट झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कार्यालयाच्या इमारतीसह साहित्याचे मोठे नुकसान झाले.

मुळशीतील पौड येथे पुणे-कोलाड महामार्गालगत असलेल्या ताम्हिणी अभयारण्याच्या वनक्षेत्रपाल कार्यालयात हा स्फोट झाला. डुक्करे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 70 ते 80 बॉम्बचा पहाटे 4 च्या सुमारास स्फोट झाला. त्यात वन खात्याच्या इमारतीला मोठे तडे गेले आहेत.

प्रशासनाने या घटनेचा तपास सुरु केला असून स्फोटाचे कारण समजले नाही.