AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bogus Seeds: बोगस बियाणं ओळखावं कसं? कुठं करावी तक्रार, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या

Fake Seeds Identify: बोगस बियाण्यांनी राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा चुना लावला आहे. समाधानकारक पाऊस असताना पेरणी करूनही शेतात काहीच उगवलं नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर आल्या आहेत. फसवणूक टाळण्यासाठी बोगस बियाणं ओळखणार कसं? जाणून घ्या एका क्लिकवर

Bogus Seeds: बोगस बियाणं ओळखावं कसं? कुठं करावी तक्रार, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या
बोगस बियाणं ओळखावं कसं? कुठं करावी तक्रार
| Updated on: Jul 10, 2026 | 1:37 PM
Share

Bogus Seeds Identify: राज्यातील अनेक भागात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अनेक नामांकित कंपन्यांचे बियाणे पेरणी करूनही काहीच उगवले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांची मेहनत वाया जाते आणि आर्थिक फटका बसतो. अशावेळी बोगस बियाणे ओळखायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्यांनाच नाही तर शेतकऱ्यांनाही बसतो. कसे ओळखता येईल बोगस बियाणे?

बियाणे खरेदी करताना सतर्क राहा

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कुठली कंपनी बोगस आहे अथवा कंपनी चांगली असते तर कधी काही तांत्रिक चुकांमुळे बियाणे उगवत नाही. बोगस बियाणे ओळखणे एकदम सोपे नाही. बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक दुकानदाराकडूनच पक्के बिल घेऊनच बियाणे खरेदी करावे. हेच बिल शेतकऱ्यांना उपयोगी पडते. कंपनीविरोधातील लढाईत ते कामी येते.

कसे ओळखणार बोगस बियाणे?

बियाणे खरेदी केल्यानंतर पाकिटातील काही बियाणे बाजूला राखून ठेवा. प्रत्येक बियाणे पाकिटावर प्रमाणपत्र टॅग आणि मुदतीची तारीख असते. ती काळजीपूर्वक तपासा. कुठल्याही फेरीवाला, मूळ किंमतीपेक्षा अधिक स्वस्त बियाणे मिळते म्हणून कच्चा बिलावर ते खरेदी करू नका. अनेकदा बियाण्यांची रि-पॅकिंग करण्यात येते आणि जुनेच बियाणे नवीन म्हणून शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. परिणामी उत्पादनात मोठी घट होते. कधी कधी तर उगवण क्षमता नसलेलेच बियाणे पेरल्याने शेतात गवताशिवाय काहीच दिसत नाही.

सर्वात महत्त्वाची खूणगाठ

अनेक जण बाजारातील बियाण्यांवर विश्वास ठेवत नाही. गावातीलच व्यक्तीकडून अथवा घरचेच बियाणे वापरतात. बाजारातील असो वा घरचे बियाणांची उगवण क्षमता तपासल्याशिवाय पेरणीची नाहक घाई करू नका.

एका ओल्या गोणपाटावर धान्यातून एकदाच 100 दाणे, दीड ते दोन सेंमी अंतरावर 10-10 च्या रांगेत ओळीत अंथरा. त्यावर दुसरे गोणपाट टाकून गुंडाळा.

आता रोज एक आठवडा या गोणपाटावर पाणी शिंपडा. त्यानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडा

एकूण बियाणांच्या 70 टक्के दाण्यांनी चांगले कोंब धरलेले असतील. तर बियाण्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे लक्षात येईल. त्यानंतर पाकिटातील बियाणे पेरणीसाठी वापरू शकता.

बाजारात उपलब्ध असलेल्या पाकिट ही इतर नामांकित कंपन्यांशी नामसाधर्म्य, डिझाईन, रंगसंगती करून विक्री होतात. त्याची योग्य तपासणीशिवाय आणि पक्क्या बिलाशिवाय, अधिकृत विक्रेत्याशिवाय बियाणे खरेदी करू नका

तुमच्या जमिनीचे आरोग्यही एकदा तपासा. म्हणजे जमिनीचा पोत, दर्जा, गुणवत्ता कशी आहे. त्यात क्षाराचे प्रमाण, आम्लाचे प्रमाण किती आहे याचा अहवाल एकदा तयार करून घ्या. उत्पादन क्षमतेआधारे योग्य कंपनीचे बियाणे निवडा. बाजारात मागणी आहे, विक्री होते म्हणून तुम्ही सुद्धा तेच बियाणे खरेदी करणे योग्य नाही.

कुठे कराल तक्रार

बोगस बियाणे आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर कृषी विभागाकडून पथकं नेमण्यात येतात. ही पथकं वेळोवेळी कारवाई करतात. बोगस बियाण्यांविषयी तक्रार नोंदवण्यासाठी शेतकरी 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ