पालघरमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ, तातडीनं 9 जिल्हाध्यक्ष बदलले, नवे पदाधिकारी कमाल करणार?

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत सुपडासाफ झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली आहे. पालघरसह 9 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे.

पालघरमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ, तातडीनं 9 जिल्हाध्यक्ष बदलले, नवे पदाधिकारी कमाल करणार?
प्रफुल्ल पाटील
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 6:33 PM

पालघर: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत नंदूरबार आणि नागपूरमध्ये काँग्रेसनं चांगलं यश मिळवलं. मात्र, पालघर आणि धुळे जिल्ह्यात पक्षाचा सुपडासाफ झाला. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत सुपडासाफ झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली आहे. पालघरसह 9 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे.

पालघरसह 9 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष बदलले

रत्नागिरी ,गोंदिया ,पिंपरी चिंचवड ,अकोला शहर ,गडचिरोली ,जळगाव ग्रामीण ,पालघर ,कोल्हापूर शहर ,धुळे शहर येथे तात्काळ नऊ जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्याची जबाबदारी प्रफुल पाटील यांच्यावर पक्षाने सोपवली असून पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षनेतृत्त्वाकडून तात्काळ संघटनात्मक बदल

पालघर जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पुरता सुफडासाफ झाला असून सर्व उमेदवार पराभूत झालेत. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाने तत्काळ संघटनात्मक फेरबदल करत विद्यमान अध्यक्ष दिवाकर पाटील यांना पदावरून हटवले. त्यांच्या ऐवजी जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष संघटनात्म पातळीवर अत्यंत कमकुवत बनला आहे. एकेकाळी कॉंग्रेसचं वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात आता अस्तित्वच शिल्लक राहतं की नाही, अशी स्थिती आहे.

नुकताच झालेल्या जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचं पानिपत झालं. त्यामुळे पालघर जिल्हा कॉंग्रेसमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

सरपंच ते जिल्हाध्यक्ष प्रवास

सरपंच ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असा प्रफुल्ल पाटील यांचा राजकीय प्रवास आहे. पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदाची सोपविलेल्या जबाबदारीचं आपण स्वागत करत आहोत, असं प्रफुल्प पाटील म्हणाले. जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहता संघटनात्मक बांधणीवर अधिक लक्ष केंद्रीत करून जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्याचं मोठं आव्हान आहे. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढून कॉंग्रेसपक्ष जिल्ह्यात उभा करू, असं प्रफुल्ल पाटील म्हणाले.

इतर बातम्या:

ZP निवडणुकीत बाजी मारली, आता महानगपालिकेसाठी प्लॅन तयार, नागपुरात काँग्रेसमध्ये उत्साह संचारला

Photo : पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष! शिवसेनेपेक्षा भाजप सरस, तर राष्ट्रवादीला झटका

Congress lost by election in Palghar Maharashtra Congress change 9 district president including Palghar

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.