AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर तुमची बारामतीची सीट जाईल असं म्हणायचं का?; दीपक केसरकर यांचा पहिल्यांदाच शरद पवार यांना सवाल

कॉपी प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान पहिल्यांदाच राबवलं जातंय. अभियानाला 90 टक्क्यांपेक्षा जास्त यश आलंय. पुढच्या वर्षी यापेक्षाही कडक अभियान राबवलं जाईल.

तर तुमची बारामतीची सीट जाईल असं म्हणायचं का?; दीपक केसरकर यांचा पहिल्यांदाच शरद पवार यांना सवाल
deepak kesarkarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 06, 2023 | 12:04 PM
Share

शिर्डी : कसब्याच्या निकालावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला डिवचलं आहे. कसब्याच्या निकालावरून देशात बदलाचा मूड असल्याचं स्पष्ट होतंय. लोकांना चेंज हवा आहे हे या निकालातून दिसून आल्याचं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या विधानावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कसब्याच्या निकालावरून जर देशात बदलाचा मूड आहे असं समजायचं तर मग चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का? असा सवाल दीपक केसरकर यांनी शरद पवार यांना केला आहे. ते शिर्डीत माध्यमांशी संवाद साधत होते.

पिंपरी-चिंचवडचा काही भाग बारामती मतदारसंघाचा भाग आहे. मग तुमची बारामतीची सीट जाईल असे आम्ही म्हणू का? पिंपर-चिंचवड बालेकिल्ला असताना तुम्ही का हारला याचे आत्मपरीक्षण करा. कासब्यातील नाराजीचा फायदा तुम्हाला मिळाला. रवींद्र धंगेकर सातत्याने जनतेत होते म्हणू निवडून आले. आम्ही टिळक कुटुंबातील उमेदवार देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. कासब्याच्या निकालाचा वर्षभर काय आनंद साजरा करायचा तो करा. वर्षानंतर मोदी साहेबांची लाट कशी असते हे पुन्हा तुम्हाला दिसेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा

उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली. या सभेला प्रयत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचीही खेडमध्ये सभा होणार आहे. केसरकर यांनी त्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या 19 मार्च रोजी खेडला सभा होईल. तेव्हा या सभेला गर्दी होईलच. बाळासाहेब सुद्धा जाणाऱ्यांना कोल्हे, लांडगे म्हणत नव्हते. उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितलं. मात्र शरद पवार आणि राहुल गांधींवर तुमचा विश्वास होता. तुम्हाला वाटलं कुणी पदावरून काढू शकत नाही. भाजपने तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींना तुम्ही खोटं बोलून फसवलं, असा आरोपही त्यांनी केला.

ती शालही विसरलात

साईबाबांची शाल नेऊन उद्धव ठाकरेंना पांघरली होती हे ते विसरले. ज्यांनी शाल पांघरली त्यांची सुद्धा आठवण न ठेवण्या एव्हढे कठोर झालात. मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी जे केलं ते मोदी विसरले नाहीत. तुम्ही मात्र एका मिनिटांत सगळं विसरले. सत्तेसाठी शिवसेना फोडणाऱ्यांसोबत गेलात, असा टोला त्यांनी लगावला.

विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क देऊ

यावेळी त्यांनी पेपरफुटी प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. कॉपी प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान पहिल्यांदाच राबवलं जातंय. अभियानाला 90 टक्क्यांपेक्षा जास्त यश आलंय. पुढच्या वर्षी यापेक्षाही कडक अभियान राबवलं जाईल. मुलांनी अभ्यास करूनच पास झालं पाहिजे हा आमचा कटाक्ष आहे. पेपर फुटल्याची आवई उठवली गेली. एखाद्या विद्यार्थ्याने पेपर मोबाईलवरून व्हायरल केला तरी इतरांपर्यंत पोहचू शकत नाही. ज्या मुलांकडे मोबाईल होते त्याच ठिकाणी ते जप्त करण्यात आले. मुलांना परीक्षेचे पूर्ण मार्क दिले जातील. पुन्हा पेपर घेतला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?