नारायण राणे म्हणाले, दीपक केसरकर शेंबडे आमदार; केसरकर म्हणतात, सिंहासनाला हादरे दिले म्हणून…

| Updated on: Nov 23, 2021 | 2:51 PM

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांची शेंबडे आमदार म्हणून अवहेलना केली होती.

नारायण राणे म्हणाले, दीपक केसरकर शेंबडे आमदार; केसरकर म्हणतात, सिंहासनाला हादरे दिले म्हणून...
deepak kesarkar
Follow us on

सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांची शेंबडे आमदार म्हणून अवहेलना केली होती. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राणेंच्या सिंहासनाला मी हादरे दिले म्हणून त्यांच्या मनात सल आहे. त्यामुळेच ते माझ्यावर ऊठसूठ टीका करत असतात, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.

दीपक केसरकर यांनी मीडियाशी संवाद साधताना राणेंवर पलटवार केला आहे. राणेंचं सिंहासन मी हलवल ती राणेंच्या मनात सल. नारायण राणेंच सिंहासन मी हलवलं याची कायम सल त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते सावंतवाडीत येऊन माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांच राजकारण चालत नाही. ते नुसतं बोलतात. कामं करत नाहीत. मी बोलून दाखवत नाही आणि ज्यावेळेला बोलतो तेव्हा काय होत हे तुम्हाला माहीत आहे. तुमचं सिंहासन हललं कोणामुळे हे तुम्हाला माहीत आहे आणि त्याचीच सल तुमच्या मनात आहे हे मला माहीत आहे, असा टोला केसरकर यांनी लगावला.

खरं बोलण्याचं तरी सौजन्य दाखवा

विधान परिषदेत जे जे घडलं ते रेकॉर्डेड आहे. पाच वर्षे मी राज्याचा अर्थसंकल्प विधान परिषदेत सादर केला. विरोधकांच्या प्रश्नाना एवढी समर्पक उत्तर दिली की कधीही राईट टू रिप्लाय त्यांना पुन्हा वापरावा लागला नाही. एवढ अभ्यास पूर्ण काम केलं पण त्याचा गवगवा कधी केला नाही. त्यामुळे ज्या जनतेने तुम्हाला एवढी वर्ष प्रेम दिलं त्यांच्याशी खरं बोलण्याचं तरी सौजन्य दाखवा, असा पलटवारही त्यांनी केला.

कसला आमदार निवडून दिला?

दरम्यान, नारायण राणे यांनी काल सावंतवाडीत कार्यकर्ता मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. सावंतवाडीचा आमदार शेंड्या आहे. कसला आमदार निवडून दिला? विधानसभेत साधं बोलता येत नाही, अशी घणाघाती टीका केसरकरांच्या होम ग्राऊंडवर जावून केली होती. मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतली जाते. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली. मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही, अशी खोचक टीकाही राणेंनी केली होती.

 

संबंधित बातम्या:

शरद पवार यांच्या भेटीला संजय राऊत, भेटीचं कारण गुलदस्त्यात

भीषण अपघात! भरधाव कार तीन वेळा पलटली, ओढ्यात कोसळली, एअरबॅगमुळे वाचले चौघांचे प्राण, औरंगाबादची घटना

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख बिटकॉईनमध्ये बुडाले, वसईतील व्यापाऱ्याचा लुटीचा बनाव