नगरच्या सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग कशामुळे?, शॉर्ट सर्किट की आणखी काही?; चौकशी होणार

| Updated on: Nov 06, 2021 | 7:45 PM

रुग्णालयात ज्या इमारतीत ही आग लागली तिथे सर्व वायरिंग कन्सिल्ड स्वरूपातील असल्याने यात शॉर्ट सर्किट झाली असण्याची शक्यता नाही, असे या आगीची पाहणी करणाऱ्या विद्युत निरीक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नगरच्या सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग कशामुळे?, शॉर्ट सर्किट की आणखी काही?; चौकशी होणार
नगरच्या सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग कशामुळे?
Follow us on

अहमदनगर : नगरमधील सिव्हिल रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज लागलेल्या भीषण आगीत 11 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. आग लागली तेव्हा आयसीयूत एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण कोरोना बाधित आहेत. आगीचे नक्की कारण अद्याप कळले नसले तरी शॉटसर्किमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे पीएमकेअर निधीमधून मिळालेल्या व्हेंटिलेटरमध्ये लागलेली आग कारणीभूत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे रुग्णालयातील फायर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. आगीनंतर 20 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

पीएमकेअरमधील व्हेंटिलेटरमुळे लागली अहमदनगर रुग्णालयात आग

नगरमधील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीमागे पीएमकेअर निधीमधून मिळालेल्या व्हेंटिलेटरमध्ये लागलेली आग कारणीभूत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पीएमकेअरमधून सदोष आणि कमी गुणवत्तेचे व्हेंटिलेटर पुरविण्यात आल्याचे आरोप होत आहेत. अशातच अहमदनगरमधील या आगीमुळे पीएमकेअरमधील व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

रुग्णालयात ज्या इमारतीत ही आग लागली तिथे सर्व वायरिंग कन्सिल्ड स्वरूपातील असल्याने यात शॉर्ट सर्किट झाली असण्याची शक्यता नाही, असे या आगीची पाहणी करणाऱ्या विद्युत निरीक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. “आम्ही पाहणी केल्यानंतर व्हेंटिलेटरमध्ये बिघाड झाला होता आणि त्यातून ठिणग्या उडाल्या हे लक्षात आले. या अतिदक्षता कक्षात रूग्णांची स्थिती गंभीर होती आणि रुग्ण व्हेंटिलेटरवर होती. व्हेंटिलेटरमध्ये ठिणग्या उडून ते बंद पडले आणि अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने रुग्णांनी जीव गमावला असे प्रथमदर्शनी दिसते. या ठिणग्यांमुळे अतिदक्षता केंद्रात आग लागली, असे आमचे निरीक्षण आहे,” असे ही पाहणी केलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. हसन मुश्रीफ हे अहमदनगरचे पालकमंत्री आहेत. घटनेची माहिती मिळताच मुश्रीफ तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईक यांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दोषींवर कारवाई करीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

नगरमधील रुग्णालय आग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे. रूग्णालयात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरुन दिली आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच निष्पाप लोकांचा जीव गेला. रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते. घटनेला जबाबदार असलेल्यांवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली आहे. (Eleven patients lost their lives in a fire that broke out in the intensive care unit of a civil hospital in the ahmednagar today)

इतर बातम्या

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरण: दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू ; मृतांच्या नावाची यादी आली समोर

ऐन दिवाळीत 11 जणांचा आगीत मृत्यू, या घटनेचा जाब विचारूच, सरकारला सोडणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा