AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरण: दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू ; मृतांच्या नावाची यादी आली समोर

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांच्या नावाची यादी समोर आली आहे.

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरण: दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू ; मृतांच्या नावाची यादी आली समोर
नगरच्या सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग कशामुळे?
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 7:24 PM
Share

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.  अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयालातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत सुरुवातीला 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर 1 रुग्ण गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारादरम्यान त्या रुग्णाचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. दरम्यान मृतांच्या नावाची यादी आता समोर आली आहेत. मृतांमध्ये सहा पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे. 1) रामकिशन विठ्ठल हरपुडे, 2) सिताराम दगडू जाधव, 3) सत्यभामा शिवाजी घोडेचोरे, 4) कडूबाई गंगाधर खाटीक, 5) शिवाजी सदाशिव पवार, 6) कोंडाबाई मधुकर कदम, 7) आसराबाई गोविंद नागरे, 8) शबाबी अहमद सय्यद, 9) दिपक विश्वनाथ जडगुळे अशी या मृतांची नोवे आहेत. 11 मृतांपैकी अद्याप दोन जणांची ओळख समोर येऊ शकलेली नाही.

दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेबाबत शोकसंवेदना व्यक्त केली असून, दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घटनेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे.  अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून, सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असं यावेळी पवार यांनी म्हटले आहे.

RUGNALY

मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा

दरम्यान आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग लागली, या आगीमध्ये अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृत्यू  झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल, तसेच संबंधित प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करू असे आश्वासन देखील यावेळी टोपे यांनी दिले आहे.

मृतांची नावे

1) रामकिशन विठ्ठल हरपुडे

2) सिताराम दगडू जाधव

3) सत्यभामा शिवाजी घोडेचोरे

4) कडूबाई गंगाधर खाटीक

5) शिवाजी सदाशिव पवार

6) कोंडाबाई मधुकर कदम

7) आसराबाई गोविंद नागरे

8) शबाबी अहमद सय्यद

9) दिपक विश्वनाथ जडगुळे

11 मृतांपैकी अद्याप दोन जणांची ओळख समोर येऊ शकलेली नाही.

संबंधित बातम्या 

Ahemadnagar Hospital Fire : मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी होणार

अहमदनगर शासकीय रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.