फडणवीसांचा परभणी दौरा रद्द; कृषी संजीवनी मोहोत्सवाचे भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन

| Updated on: May 06, 2022 | 1:30 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणीत कृषी संजीवनी मोहोत्सवाचे उद्घाटन होणार होते. मात्र फडणवीस यांचा परभणी दौरा रद्द झाल्याने आता केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते मोहोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

फडणवीसांचा परभणी दौरा रद्द; कृषी संजीवनी मोहोत्सवाचे भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

परभणी : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा परभणी (Parbhani) दौरा रद्द झाला आहे. व्हायरल फिव्हरमुळे हा दौरा देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे. आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषी संजीवनी मोहोत्सवाचे उद्घाटन होणार होते. मात्र फडणवीस आता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीयेत. फडणवीस यांना व्हायरल फिव्हर झाल्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आनंद भरोसे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड (Bhagwat Karad) आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर हजर राहणार होते. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दौरा रद्द झाल्याने केंद्रीय मंत्री  भागवत कराड यांच्या हस्ते या कार्यक्रामाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला बबनराव लोणीकर देखील उपस्थित राहणार आहेत.

भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन

देवेंद्र फडणवीस यांना व्हायरल फिव्हर झाल्यामुळे त्यांनी परभणी दौरा रद्द केल्याची माहिती कृषी संजीवनी मोहोत्सवाचे आयोजक आनंद भरोसे यांनी दिली. या मोहोत्सवाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस गौरहजर राहणार असल्याने या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला बबनराव लोणीकर हे देखील उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषीशी संबंधित विविध वस्तूंचे प्रदर्शन

दरम्यान या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित विविध अवजारे तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत यत्र प्रदर्शनासाठी मांडले आहेत. यात शेतीची कामे सुलभ करणाऱ्या विविध यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भागवत कराड यांच्या हस्ते होणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.