AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ तरुणांची शेवटची सकाळ ठरली; दोन कार आणि बाईकचा विचित्र अपघात; तीन तरूण जागीच ठार

बुलढाण्यात आज सकाळी झालेल्या विचित्र अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही तरुण बाईकवरून जात होते. तिन्ही तरुण एकाच गावचे आहेत. तर अपघातात काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

'त्या' तरुणांची शेवटची सकाळ ठरली; दोन कार आणि बाईकचा विचित्र अपघात; तीन तरूण जागीच ठार
accidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 07, 2023 | 8:26 AM
Share

बुलढाणा : जीवन मृत्यूचं काहीच सांगता येत नाही. थोड्यावेळापूर्वी हसत खेळत असणाऱ्यांचं क्षणात काय होईल हे सांगता येत नाही. बुलढाण्यातील तीन तरुणांच्या बाबतीतही असंच काही तरी घडलं आहे. पहाटेपर्यंत हसतखेळत असलेल्या तीन तरुणांवर अचानक काळाने घाला घातला आहे. आजची सकाळ या तरुणांची शेवटची सकाळ ठरली. बुलढाण्यात एका विचित्र अपघातात या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

बुलढाण्याच्या खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव साकार्शा गावाजवळ दोन कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील तीन युवक जागीच ठार झाले. भरधाव बाईकने आधी एका कारला धडक दिली. ही अनियंत्रित बाईक दुसऱ्या गाडीवर धडकली. यावेळी दोन्ही गाड्या अनियंत्रित होऊन एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे या गाड्या पलटी झाल्या. कारचा चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की बाईकवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्वजण देऊळगाव साकार्शाचे रहिवासी

मृतक हे देऊळगाव साकार्शा येथील रहिवासी आहेत. सकाळी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. जखमींनाही तातडीने उपचार मिळावेत म्हणून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस या घटनेचा पंचनामा करत आहेत. तसेच जखमींची चौकशी करून अपघाताची माहिती घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बस दुभाजकाला धडकली

नाशिक आगाराची बस नाशिकवरून नागपूरला जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात बेलाड फाट्याजवळ दुभाजकावर चढली. यावेळी अपघात होता होता राहिला. दुभाजक लहान असल्याने या दुभाजकाचा चालकाला अंदाज न आल्याने बस दुभाजकावर चढली. या बसमध्ये एकूण 47 प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. बस दुभाजकाच्यामधोमध फसल्याने शेवटी क्रेनच्या साहाय्याने एसटी बसला दुभाजकावरून बाहेर काढण्यात आले.

मनमाडमध्ये ट्रक कोसळला

दरम्यान, मनमाड- नगर महामार्गावरील मनमाडजवळच्या अनकवाडे शिवारात कंटेनरने कट मारल्याने भरधाव ट्रक रेल्वे ओव्हर ब्रिजचा कथडा तोडून 20 ते 25 फूट खाली कोसळला. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. सुदैवाने अपघातग्रस्त ट्रक मनमाड-पुणे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिकांनी मदत कार्य राबवून अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेल्या ट्रक चालकास बाहेर काढले. त्याच्यावर मनमाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Follow Us
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा
Datta Bharene | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांबाबत नवी अपडेट समोर, आता...
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी