Video : Chandrapur Fire | 20 एकरात अग्नितांडव, 50 कोटींचे नुकसान, 40 बंबांकडूनही आग विझेना, पेट्रोलपंपही कचाट्यात, चंद्रपूरच्या आगीला जबाबदार कोण?

नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर येथून अग्निशमन दलाच्या बंब आले. वरिष्ठ महसुली व पालिका अधिकाऱ्यांसह पेपर मिलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. पण, या आगीला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Video : Chandrapur Fire | 20 एकरात अग्नितांडव, 50 कोटींचे नुकसान, 40 बंबांकडूनही आग विझेना, पेट्रोलपंपही कचाट्यात, चंद्रपूरच्या आगीला जबाबदार कोण?
बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आगImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 12:08 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर (Ballarpur) तालुक्यातील कळमना ( Kalmana) येथे पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आग अद्याप सुरूच आहे. जिल्हा व आसपासच्या अग्निशमन (Fire Brigade) यंत्रणांच्या 40 बंबानी 350 हुन अधिक फेऱ्या करूनही आग धुमसणे सुरूच आहे. रात्रभर ही आग विझविण्याचे कार्य चालले. 20 एकरांवर पसरलेल्या लाकूड डेपोची यात राख झाली. 50 कोटींहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आग कमी झाल्यावर पहाटे या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. याच डेपोच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला आग लागली होती. मात्र साठा नसल्याने पंप 3 दिवसांपासून बंद होता. त्यामुळे मोठी हानी टळली. प्रचंड आग-सोसाट्याचा वारा आणि जलस्त्रोतापासून जास्त असलेले अंतर यामुळे अग्निशमन बंबाना पाणी भरून आणण्यासाठी वेळ लागतोय.

पाहा व्हिडीओ

अग्निशमन यंत्रणेची धावाधाव

सकाळपासून अग्निशमन कार्याने वेग घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जुन्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगाने लाकूड आगारात अग्निशमन यंत्रणा उभारताना अक्षम्य हलगर्जीपणा दाखविण्यात आले. जिल्हा व आसपासच्या यंत्रणांना नाहक त्रास आणि आगीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय. जिल्हा प्रशासन या उद्योगावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या बंबांचे आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर येथून अग्निशमन दलाच्या बंब आले. वरिष्ठ महसुली व पालिका अधिकाऱ्यांसह पेपर मिलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. पण, या आगीला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

अग्निकांडात अनोखी माणुसकी

कळमना गावाजवळ झालेल्या पेपर मिल लाकूड साठवण भीषण अग्निकांडात अनोखी माणुसकी दिसली. या अग्निकांडानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला. त्यामुळे चंद्रपूर- आष्टी महामार्गावर दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या. यात बस प्रवासी वऱ्हाडी व खाजगी ट्रक- वाहनांचा देखील समावेश होता. स्त्रिया- लहान मुले व वृद्ध यांची भुकेली अवस्था बघून स्थानिक युवक आणि ग्रामस्थ पुढे सरसावले. स्थानिक युवकांनी निधी एकत्र करत ताटकळलेल्या प्रवाशांना पाणी- चहा व बिस्किटे अशी खाद्य सामुग्री पुरविली. स्थानिक युवकांच्या या पुढाकाराचे प्रवाशांनी आभार मानले. मात्र ताटकळलेल्या प्रवाशांसाठी मदत पुरवण्यास प्रशासन अपयशी ठरले.

Non Stop LIVE Update
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.