Vidarbha Flood : गोदावरी – प्राणहिता नद्यांचा विसर्ग वाढणार, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा, अतिवृष्टीने राज्यातील 104 जणांचा बळी

| Updated on: Jul 17, 2022 | 2:31 PM

राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

Vidarbha Flood : गोदावरी - प्राणहिता नद्यांचा विसर्ग वाढणार, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा, अतिवृष्टीने राज्यातील 104 जणांचा बळी
नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
Follow us on

गडचिरोली : सततच्या पावसामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग (Flooding of Godavari river) वाढण्याची शक्यता आहे. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा (warning alert) देण्यात आला आहे. नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 20 मिमी एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सदर नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित (route blocked) झालेत. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या 10 हजार 606 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यांच्यासाठी 35 मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 85 गेट उघडलेले आहेत. गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परशुराम घाटात एकेरी वाहतूक

कोकण विभागात – रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 20 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडतात. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा 30 जुलै 2022 पर्यंत सकाळी सहा वाजतापासून ते सायंकाळी सात वाजतापर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. सायंकाळी सात वाजता ते सकाळी सहा वाजतापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर-कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील 11 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत. राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात आहेत. मुंबई -3, पुणे-2 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-2, नागपूर-2 अशा एकूण 4 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.

हे सुद्धा वाचा