पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात भेसळ, प्लास्टिकचा तांदुळ सापडल्यानं खळबळ

| Updated on: Jul 12, 2021 | 6:17 AM

पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील तांदळात भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात भेसळ, प्लास्टिकचा तांदुळ सापडल्यानं खळबळ
तांदूळ
Follow us on

पालघर : पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील तांदळात भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. मोखाडा तालुक्यातील खोडाळा वाकडपाडा येथे ही घटना समोर आली. हा तांदूळ प्लास्टिकचा असून या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप झालाय. त्यामुळे या तांदूळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील पालकांकडून करण्यात येत आहे (Fraud in school rice in Mokhada Palghar parents demand action).

कोरोनामुळे सध्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांना घरीच वाटप करण्यात येत असून पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील तांदूळात मोठ्या प्रमाणावर भेसळ असल्याच समोर आल आहे . पालघर मधील मोखाडा तालुक्यातील खोडाळा वाकडपाडा येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेला तांदूळ हा पालकांनी पुन्हा शाळेत परत केला आहे. तांदूळ निवडताना आणि गिरणीत टाकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका, पालकांमध्ये भीतीचं वातावरण

या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे . हा भेसळयुक्त तांदूळ पाण्यात टाकल्यास काही वेळाने पाण्यावर तरंगू लागतो . भिजलेला तांदूळ हातात घेतल्यास पूर्णपणे विरघळला जात असून आगी वर ठेवल्यास पेट घेत असून त्याला प्लास्टिक सारखा उग्र वास येतोय .पालघर मधील शाळांना पोषण आहारासाठी वाटप केला जाणारा तांदूळ हा जळगाव येथील तांदूळ गिरणीतून येत असून या ठेकेदारावर शासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालक आणि शालेय समिती कडून करण्यात येत आहे .

तांदूळ प्लास्टिक सदृश्य असा भेसळयुक्त असल्याची कबुली

पोषण आहारात वाटप केला गेलेला तांदूळ हा मोखाडा पंचायत समिती कार्यालयामार्फत देण्यात आला असून पालकांच्या तक्रारीनंतर हा प्रकार वाटप करणाऱ्या शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांच्या लक्षात आला . हा तांदूळ प्लास्टिक सदृश्य असा भेसळयुक्त असल्याची कबुली देखील शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापक यांच्याकडून देण्यात आली आहे . त्यामुळे शालेय समितीने दिलेल्या तक्रारीनुसार या तांदळाचे नमुने तपासणीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आले असून अहवाल सादर झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आल आहे.

तांदळाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

पालघरमध्ये सध्या देण्यात आलेला भेसळयुक्त तांदूळ अनेक शाळांमध्ये समोर येत असून जिल्ह्याला पुरवठा करणाऱ्या या तांदळाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे . त्यामुळे यावर जिल्हा परिषदेने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.

मुलांच्या आरोग्याशी खेळणारे राज्याचे कृषी मंत्री तथा पालघर चे पालक मंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि तांदूळ सप्लाय करणारी साई ट्रेडिंग कंपनी वर कारवाई ची मांगणी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे यांनी केली आहे.

हेही वाचा :

भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

‘जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?’ उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान

बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय, भारतासाठी सर्वाधिक फायदेशीर

व्हिडीओ पाहा :

Fraud in school rice in Mokhada Palghar parents demand action