गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावातील मुलीची गगनभरारी, MPSC परीक्षेत दमदार कामगिरी

| Updated on: Oct 13, 2021 | 1:06 PM

झिंगानुर सारख्या अतिदुर्गम अतिसंवेदनशील गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन सिरोंचाच्या प्रियांका स्वामी दासरीने एमपीएससीचे शिखर गाठलं आहे. तिने एमपीएससी परीक्षेत सहावा क्रमांका पटकावला आहे. प्रियांका दासरीने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पशुसंवर्धन विकास अधिकारी पद गट अ-LDO यश प्राप्त केलं आहे.

गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावातील मुलीची गगनभरारी, MPSC परीक्षेत दमदार कामगिरी
Priyanka Dasari
Follow us on

गडचिरोली : झिंगानुर सारख्या अतिदुर्गम अतिसंवेदनशील गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन सिरोंचाच्या प्रियांका स्वामी दासरीने एमपीएससीचे शिखर गाठलं आहे. तिने एमपीएससी परीक्षेत सहावा क्रमांका पटकावला आहे. प्रियांका दासरीने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पशुसंवर्धन विकास अधिकारी पद गट अ-LDO यश प्राप्त केलं आहे.

प्रियांकाचा जन्म सिरोंचा येथे झाला. प्रियांकाचे वडील स्वामी दासरी हे पोलीस शिपाई असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्य आहेत. प्रियंकाचे वडील पोलीस शिपाई असल्यामुळे त्यांनी अतिदुर्गम अतिसंवेदनशील भागात पोलीस ठाण्यात अनेक दुर्गम भागात आपली सेवा बजावली. प्रियांकाचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण सिरोंचा जिल्हा परिषद शाळेत झाले. तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषद झिंगानुर आणि पुढील धर्मराव विद्यालय सिरोचा येथे आठवी ते दहावी पर्यंत घेऊन अकरावी बारावीच्या शिक्षणाकरीता चंद्रपूर येथे विद्यानिकेतन ज्युनिअर महाविद्यालयात गेली. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवीच्या शिक्षणाकरिता तिने नागपूर गाठले. तेथून पदवीधर शिक्षणाकरिता ती चैन्नई येथे गेली.

दहावी पासून ते पदवीपर्यंतचा हा प्रवास प्रियंकासाठी आव्हानात्मक होता. कोणत्याही परिस्थितीत आपले लक्ष्य पूर्ण करण्याची जिद्द प्रियांकात होती. अनेक अडचणींचा सामना करीत ही जिद्द प्रियंकाने पूर्ण केली. अखेर प्रियांका स्वामी दासरीला यश मिळाले. एमपीएससी परीक्षेत ओपन मधून सहावा क्रमांक प्राप्त केलेली सिरोंचा तालुक्यातील पहिली कन्या असल्याचा मान तिने मिळवला.

प्रियांका स्वामी दासरीने यशस्वी शिखराचे श्रेय पाठीशी राहिलेले आई-बाबा आणि बहिणी भावला आणि वेळोवेळी मार्गदर्शन देणारा शिक्षकांना दिले आहे. “माझ्या कुटुंबाच्या हिंमतीनेच मी हे शिखर गाठले आहे”, असं प्रियंकाने म्हटले.  “तुमच्यासमोर किती मोठा आव्हान असो तुमच्यात जिद्द असली तर ते करणे अगदी सोपे राहते हेच मी माझे बाबा चे मनने नेहमी ऐकत होते म्हणून आज मी यशस्वी झाली”, अशा शब्दात यशस्वी झालेल्या प्रियांकाने व्यक्त आपला आनंद केला.

सिरोंचा तालुक्यात आतापर्यंत पाच युवक-युवतींना एमपीएससीमध्ये प्राधान्य

1) फणिंद्र गादेवार नावाचे RFO वन परिक्षेत्रअधिकारी आहेत तर दुसरे

2) जितेंद्र गादेवार म्हणून सध्या चंद्रपूर येथे तहसीलदार आहेत हे दोघेही भाऊ एमपीएससी मध्ये उत्तीर्ण होऊन एक वनपरिक्षेत्राधिकारी तर दुसरे तहसीलदार पद प्राप्त केले

3) जितेश आरेवली चारी पेटींपाका येथील रहिवासी असून यांनी एमपीएससी परीक्षा देऊन उप पोलिस निरीक्षक पद प्राप्त केला

4) तर चौथ्या क्रमांकावर चीनुरी विलास रेगुंठा नरर्सापल्ली येथील रहिवासी असून याने वनविभागात पदवी प्राप्त केली

5) आता पाचव्या क्रमांकावर प्रियांका स्वामी दासरी हिने शेखर गाठले पशुसंवर्धन विकास अधिकारी म्हणून पदवी प्राप्त केली

सिरोंचा तालुक्यातील या पाच विद्यार्थ्यांनी अधिकारी होऊन एक आदर्श सिरोंचा तालुक्यात निर्माण केला आहे. सिरोंचा तालुक्यातून एमबीबीएस पदवीत ही कोमल मडावी, कोमल पेद्दापल्ली आणि सिरिष रंगुवार या तीन विद्यार्थ्याने आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होऊन एक आपला आदर्श निर्माण केला. परिस्थिती कशी असो माणसात जिद्द असली तर काही करु शकतो हे सिद्ध करणारे हे सर्व विद्यार्थी अधिकारी बनले या सर्वांसाठी माझा अभिनंदन या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या पालकांना आणि शिक्षकांना ही खूप खूप अभिनंदनाचे मेसेज सोशल मीडियावर खूपच वायरल होताना दिसले.

संबंधित बातम्या :

‘शाब्बास रे पोरांनो, नाव कमावलं’, MPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गावकऱ्यांकडून जंगी मिरवणूक

MPSC PSI Physical Test Date | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त