गेवराईची जागा राष्ट्रवादीसाठी महत्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल, जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास

| Updated on: Sep 27, 2021 | 11:53 PM

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे सरकारचे धोरण आहे. लवकरच या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्याचे मंत्रिमंडळ करेल असा शब्द जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

गेवराईची जागा राष्ट्रवादीसाठी महत्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल, जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास
गेवराईची जागा राष्ट्रवादीसाठी महत्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल
Follow us on

बीड : गेवराईची जागा राष्ट्रवादीसाठी महत्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. गेवराईत सर्व 100 टक्के बुथ अध्यक्ष उपस्थित आहेत. परिवार संवाद यात्रेत गेवराई हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे इतके चांगले नियोजन आहे. इथल्या बुथ अध्यक्षांच्या नियमित बैठका झाल्या आहेत. त्यांना नियमित कार्यक्रम दिले तर 2024 साली गेवराई मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (Gevrai ‘s seat is important for the NCP and will be elected hundred percent, jayant patil)

जयंत पाटलांचे आवाहन

राज्यात सरकार आपले आहे मात्र केंद्रात नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरात महागाई वाढली आहे. असं समजा आपण विरोधातच आहोत आणि केंद्र सरकारच्या विरोधात संघर्षाची भूमिका घ्या, आंदोलन करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले. मराठवाड्यात मागील महिन्यापासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व पिके नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे सरकारचे धोरण आहे. लवकरच या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्याचे मंत्रिमंडळ करेल असा शब्द जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन

गेवराई आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक बंधारे फुटले आहेत, या भागातील नागरिकांनी चिंता करू नये. नुकसान झालेले सर्व बंधाऱ्यांची लवकरच दुरुस्ती केली जाईल. गेल्या दोन-तीन वर्षात शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. निसर्ग चक्रामुळेही शेतकरी व सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. 19 पाझर तलाव दुरुस्तीला ताबडतोब कसा निधी मिळवून द्यायचा यासाठी प्रयत्न करू. जर जलसंधारण विभागाचे असतील तर संबंधित मंत्र्यांना भेटून पालकमंत्री व मी कॅबिनेटमध्ये तरतूद करुन घेऊ असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.

गेवराई विधानसभा मतदारसंघाचा जयंत पाटलांकडून आढावा

गेवराईने आपलं वेगळंपण दाखवलेय, नोंदवले आहे. राष्ट्रवादीची प्रचंड ताकद इथे आहे. आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद जिंकतो मग विधानसभेत काय घडतंय अशी विचारणा सामाजिक न्यायमंत्री यांनी परिवार संवाद यात्रेतील आढावा बैठकीत केली. गेवराई विधानसभेतील पराभवाचा मनात प्रचंड राग असेल तर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या सर्वच्या सर्व जागा निवडून दाखवा. तुमचे-आमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गेवराई आपल्याला जिंकायचीच आहे असे आवाहनही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. आज दुपारी बीड जिल्हयात आगमन झाले. यावेळी गेवराई विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, निरीक्षक जीवनराव गोरे, माजी आमदार उषा दराडे, आमदार संजय दौंड, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके, जिल्हा परिषद अध्यक्षा सुलोचना शिरसाट, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंखे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Gevrai ‘s seat is important for the NCP and will be elected hundred percent, jayant patil)

इतर बातम्या

रायगडमधील शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद मिटवण्यासाठी दोन्ही खासदार सरसावले, दोन तास गुप्त बैठक

‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले; हाच तो दिवस’, जयंत पाटलांचा घणाघात