रायगडमधील शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद मिटवण्यासाठी दोन्ही खासदार सरसावले, दोन तास गुप्त बैठक

खासदार सुनील तटकरे आणि सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदरांची एक गुप्त बैठक तब्बल दोन तास सुरू होती. यामध्ये शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे हे आक्रमक भूमिकेत होते.

रायगडमधील शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद मिटवण्यासाठी दोन्ही खासदार सरसावले, दोन तास गुप्त बैठक
रायगडमधील शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद मिटवण्यासाठी दोन्ही खासदार सरसावले
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 10:55 PM

रायगड/ मेहबूब जमादार : माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर रायगड जिल्‍ह्यातील आघाडीत बिघाडी झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने रायगडमध्ये येऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली. यावेळी सेना पदाधिकाऱ्यांकडून तटकरेंच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला तर दुसरीकडे खासदार तटकरे यांनी देखील राजकीय उत्तर द्यायला राष्ट्रवादी समर्थ असल्याचे सांगितल्याने आज अलिबागमध्ये होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Both the MPs rushed to settle the dispute between Shiv Sena and NCP in Raigad)

सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणेंमध्ये गुप्त बैठक

या बैठकीत जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी जाहीरपणे पालकमंत्री निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केल्याने तणाव निर्माण झाला. मात्र शिवसेनेच्याच आजी माजी आमदारांनी नवगणे यांना गप्प केले. यानंतर खासदार सुनील तटकरे आणि सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदरांची एक गुप्त बैठक तब्बल दोन तास सुरू होती. यामध्ये शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे हे आक्रमक भूमिकेत होते. त्यांना समजावण्यात दोन तास निघून गेले. बैठकीनंतर मात्र सर्वजण आघाडीचा धर्म पाळणार असल्याची सारवा सारव करण्यात आली.

काय म्हणाले होते अनंत गिते?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी रायगडमध्ये केले होते. श्रीवर्धन तालुक्यात 21 सप्टेंबर रोजी सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केले होते. कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. आघाडीचे नेते आघाडी सभांळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सभांळायची आहे. उद्या आघाडी तुटलीच तर आपण तटकरेकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही. माजी केद्रिंय मंत्री अनंत गिते यांनी श्रीवर्धनमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान आघाडी सरकारवर घाणागाती टिका करुन येत्या ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळाचा नारा दिला आहे. (Both the MPs rushed to settle the dispute between Shiv Sena and NCP in Raigad)

इतर बातम्या

‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले; हाच तो दिवस’, जयंत पाटलांचा घणाघात

जळगाव जिल्हा बँक निवडणूक; एकनाथ खडसे, गिरीश महाजनांमध्ये एकमत होणार?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.