‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले; हाच तो दिवस’, जयंत पाटलांचा घणाघात

दिल्लीच्या तख्ताने पवारांना नमवण्याचा प्रयत्न केला परंतु दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले. ही घटना लोकांच्या मनावर खोलवर बसली की आज महाराष्ट्राच्या सत्तेत आपण आहोत'. याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दिली.

'दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले; हाच तो दिवस', जयंत पाटलांचा घणाघात
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 10:27 PM

जालना : ‘दोन वर्षापूर्वी शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस आली आणि आजच्या दिवशीच ईडीला आव्हान देत मीच येतो असा इशारा पवारसाहेबांनी दिला आणि राज्य व देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. या देशात सूडाचं राजकारण सुरू आहे हाच तो भाग होता. शरद पवारांचा त्या प्रकरणाशी संबंध नव्हता. जाणीवपूर्वक बदनामी करायची हे कुटील कारस्थान होते. दिल्लीच्या तख्ताने पवारांना नमवण्याचा प्रयत्न केला परंतु दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले. ही घटना लोकांच्या मनावर खोलवर बसली की आज महाराष्ट्राच्या सत्तेत आपण आहोत’. याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दिली. (Jayant Patil criticizes BJP over ED notice received by Sharad Pawar a year ago)

‘महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री जगात कामाने मोठा झाला’

पवारसाहेबांच्या किमयेने व दूरदृष्टीने राज्यात सरकार स्थापन झाले आणि त्यात राजेश टोपे मंत्री झाले आणि आरोग्य मंत्री म्हणून त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले. देशात आरोग्याचे चांगले काम न केल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना काढून टाकण्यात आले. परंतु महाराष्ट्राचा हा आरोग्यमंत्री जगात कामाने मोठा झाला. मूर्ती लहान पण किर्ती महान असे राजेश टोपे यांचे काम आहे, असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले. सरकार आल्यावर संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कामांना प्राधान्य देता येतो. दिवस हे बदलत असतात. आज आपली सत्ता आली आहे. या नेत्यामुळे तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. पक्षाची मरगळ झटकून टाकावी या उद्देशाने ही परिवार संवाद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढली आहे.

‘पायाला भिंगरी लावून 288 मतदारसंघात जयंत पाटील जात आहेत’

पायाला भिंगरी लावून 288 मतदारसंघात जयंत पाटील जात आहेत आणि जाणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. घनसावंगीच्या पदाधिकार्‍यांनी शंभर टक्के बुथ कमिट्या तयार केल्या आहेत. संघटना बाबी लक्षात घेऊन काम करण्याची गरज आहे. आजपासून आमदार कार्यालयातून यापुढे काम होणार नाही तर ते बुथ कमिट्यांच्या माध्यमातून होतील असा शब्द राजेश टोपे यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैकीच्या पैकी निवडून आणल्या पाहिजेत असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा पाचवा दिवस असून जालना जिल्हयातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके, जालना जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

इतर बातम्या :

जळगाव जिल्हा बँक निवडणूक; एकनाथ खडसे, गिरीश महाजनांमध्ये एकमत होणार?

आता टार्गेट रश्मी ठाकरे! उद्धव ठाकरेंनी बंगले घेण्यासाठी रश्मी वहिनींचा वापर केला; सोमय्यांचा घणाघात

Jayant Patil criticizes BJP over ED notice received by Sharad Pawar a year ago

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.