शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, राज्यातील कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या ठिकाणी ही भेट झाली.

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, राज्यातील कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा?
NCP chief Sharad Pawar meet CM Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 1:53 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या ठिकाणी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बैठक झाली.  यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं 2 कोटी 36 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राज्यातील पूरपरिस्थिती, कोरोना परिस्थिती, 12 आमदारांचा मुद्दा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र, महाविकास आघाडीतील समन्वय, छगन भुजबळ यांना मिळालेली क्लिनचीट या मुद्यांवर चर्चा झाली. तसंच यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं 2 कोटी 36 लाखांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे दिला.

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अजूनही राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्यांचा प्रश्न मिटलेला नाही. त्यामुळे या भेटीत या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती. यामध्ये  राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि  महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

 कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता

  • राज्यातील पूर परिस्थिती,कोरोना परिस्थिती
  • 12 आमदारांचा मुद्दा
  • ओबीसी राजकीय आरक्षण
  • राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र
  • महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे

12 आमदारांचा मुद्दा

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा वाद अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी 1 सप्टेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीची कोंडी फोडण्यासाठी ही भेट घेण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादीची बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले 114 उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या.

सरसकट आघाडी नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशाही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या  

सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, नवाब मलिक यांचं मोठं विधान; राष्ट्रवादीही ‘स्वबळा’च्या मूडमध्ये?

 राष्ट्रवादीचं ‘मिशन 114’?, विधानसभेला तिकीट दिलेल्या 114 उमेदवारांसोबत पवारांची बैठक; मतदारसंघांचा घेतला आढावा

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.