बुलडाण्यात 32 प्रवाशांसह धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग, बस जळून खाक

| Updated on: Oct 26, 2021 | 7:47 AM

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टी जवळ एका खाजगी ट्रॅव्हल्स बसलाला भीषण आग लागल्याने बस पूर्णपणे जळून खाक झालीये. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर आग लागल्यावर चालकाने ट्रॅव्हल्सला रस्त्याच्या कडेला उभे केल्याने सर्व प्रवाशांचा जीव वाचला आहे.

बुलडाण्यात 32 प्रवाशांसह धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग, बस जळून खाक
Buldhana bus fire
Follow us on

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टी जवळ एका खाजगी ट्रॅव्हल्स बसलाला भीषण आग लागल्याने बस पूर्णपणे जळून खाक झालीये. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर आग लागल्यावर चालकाने ट्रॅव्हल्सला रस्त्याच्या कडेला उभे केल्याने सर्व प्रवाशांचा जीव वाचला आहे.

आगीत जळून खाक झालेली हरिकृष्णा ट्रॅव्हल्स ही पुण्यावरुन छत्तीसगढला जात होती आणि यात 32 प्रवाशी प्रवास करत होते. मात्र, साधारण रात्री साडे 11 ते 12 दरम्यान जिजाऊ सृष्टी जवळ आल्यावर गाडीतून अचानक धूर आल्याने झोपलेले प्रवाशी जागे झाले आणि एकच गोंधळ उडाला.

यावेळी आरडाओरड झाली आणि चालकाने गाडी बाजूला उभी करताच गाडीने पेट घायला सुरुवात केली. यावेळी प्रवाशांनी सर्व सामान सोडून गाडीतून उतरुन आपला जीव वाचवला. मात्र, यात गाडी पूर्णपणे जळून खाक झालीये. गाडीत असलेल्या वायरिंगला शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जातोय. या घटनेनंतर घटनास्थळी फार मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य केले.

ट्रकची जोरदार धडक, केमिकल्सवाहू टँकर उलटून पेटला

केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली. या अपघातात टँकर पलटी होऊन आग लागली. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात घडली. या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

सोमवारी (25 ऑक्टोबर) केमिकल्स नेणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यामुळे टँकर उलटून पेटला. या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात राहुड घाटात हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होते, मात्र वेळीच आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

संबंधित बातम्या :

Pune Fire | पुण्यात भीषण आग, तब्बल 2 कोटींचे नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

मुंबईत दहा वर्षात तब्बल 48,434 आगीच्या घटना, ठोस उपायोजनांची गरज