मुंबईत दहा वर्षात तब्बल 48,434 आगीच्या घटना, ठोस उपायोजनांची गरज

दहा वर्षात मुंबईत तब्बल 48,434 आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस मुंबई अग्निशमन दलांनी ही माहिती दिली आहे.

मुंबईत दहा वर्षात तब्बल 48,434 आगीच्या घटना, ठोस उपायोजनांची गरज
MUMBAI FIRE
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 6:02 PM

मुंबई : मुंबईत गगनचुंबी इमारतीचे जाळे पसरले आहे. हे शहर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्या हेच शहर अपघाताचे शहर बनले आहे. कारण दहा वर्षात मुंबईत तब्बल 48,434 आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस मुंबई अग्निशमन दलांनी ही माहिती दिली आहे.

दहा वर्षात 48434 आगीच्या दुर्घटना 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे 2008 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आग लागली आहे, याची माहिती मागितली होती. तसेच ही आग कोणत्या कारणामुळे लागली आहे, असेदेखील त्यांनी विचारलं होतं. आगीच्या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच किती रुपयांच्या मालमत्तेच्या नुकसान झाले आहे, याबाबत शेख यांनी माहिती विचारली होती. ही माहिती समोर आल्यानंतर मुंबई शहर आता अपघातांचे शहर आहे की काय ? असे विचारले जाऊ लागले आहे.  सन 2008 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 48434 आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात 1568 गगनचुंबी इमारतीत आग लागली आहे.

8737 रहिवाशी इमारती 3833 व्यासायिक इमारतीत आग

तसेच 8737 रहिवाशी इमारती 3833 व्यासायिक इमारतीत आणि 3151 झोपडपट्ट्यांमध्ये आग लागली आहे. यामध्ये शॉर्टसर्किटमुळे 32,516  आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. तर गॅस सिलिंडर लीक झाल्यामुळे 1116 तर 11,889 घटनांमध्ये अन्य कारणामुळे आग लागली आहे.  तसेच एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात  212 पुरुष व  212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. या सर्व आगीत आगीच्या घटनेत 890486102/- रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच वर्ष 2020 मध्ये एकूण 3841 आगीच्या अपघातात 100 जणांचा मृत्यू व 298 जखमी झाले आहेत.

परिमंडळ-IV च्या  हद्दीत एकूण 8328 आगीच्या घटना

परिमंडळ-I च्या हद्दीत एकूण 9887 आगीच्या घटन्या घडल्या असून त्यात 325 गगनचुंबी इमारत, 1546 रहिवाशी इमारत, 987 व्यावसायिक इमारत आणि 75 झोपड्यांच्या ठिकाणी आग लागली आहे. तसेच परिमंडळ-II चे हद्दीत सर्वात जास्त एकूण  10719 आग लागली असून त्यात 129 गगनचुंबी इमारत, 1824 रहिवाशी इमारत, 664 व्यावसायिक इमारत आणि 934 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-III चे हद्दीत एकूण 8717 आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटना 496 गगनचुंबी इमारत, 1382 रहिवाशी इमारत, 939 व्यावसायिक इमारत आणि 443 झोपड्यात घडल्या आहेत.  परिमंडळ-IV च्या  हद्दीत एकूण 8328 आगीच्या घटना घडल्या आहेत. 289 गगनचुंबी इमारत, 1835 रहिवाशी इमारत, 661 व्यावसायिक इमारत आणि 403 झोपड्यात आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच परिमंडळ-V च्या हद्दीत एकूण 5683 आगीच्या घटना घडल्या आहेत.  त्यात 50 गगनचुंबी इमारत, 1547 रहिवाशी इमारत, 208 व्यावसायिक इमारत आणि 1273 झोपड्यात आगी लागल्या आहेत.

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-III च्या हद्दीत एकूण 496 आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत परिमंडळ-IV च्या हद्दीत 1835 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे.

 इतर बातम्या : महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी भाजपची 8 महिन्यांपूर्वी बैठक, रोहित पवार यांच्या दाव्यानंतर खळबळ

अजित पवारांनी कारखाने विक्रीची लिस्टच दिली; सोमय्या म्हणतात, दुनिया की सैर करलो, पण मूळ मुद्दा बाजूलाच राहिला

‘थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’ राधाकृष्ण विखे यांचा घणाघात

(total 48434 fire incidents in Mumbai in ten years know all data and information)

Non Stop LIVE Update
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.