महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी भाजपची 8 महिन्यांपूर्वी बैठक, रोहित पवार यांच्या दाव्यानंतर खळबळ

सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली होती, असा दावा रोहित यांनी केलाय. ते आज जळगावात बोलत होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी भाजपची 8 महिन्यांपूर्वी बैठक, रोहित पवार यांच्या दाव्यानंतर खळबळ
rohit pawar


जवळगाव : मागील अनेक दिवसांपासून माहविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागला आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळ्या तपास संस्थांच्या कचाट्यात सापडले आहेत. याच कारणामुळे ईडी, सीबीय तसेच आयकर विभाग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली होती, असा दावा रोहित यांनी केलाय. ते आज जळगावात बोलत होते.

रोहित पवार यांनी कोणता दावा केला ?

आमदार रोहित पवार हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात दुपारी दीड वाजता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. “साधारण सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. या बैठरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू आहे,” असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला. तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला

महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडी, आयटीच्या रडारवर

मागील अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीचे नेते ईडी, आयकर विभाग तसेच अन्य केंद्रीय तपास संस्थांच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील (City Co-operative Bank) 900 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरु आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागेदेखील ईडी तसेच अन्य तपास संस्था लागलेल्या आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळीदेखील ईडीच्या रडारवर आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे तसेच मंदाकिनी खडसे यांची भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: जरंडेश्वरसह कोणता कारखाना कधी, कुणाला आणि कितीला विकला?; अजित पवारांनी सादर केली जंत्री

‘…अन्यथा महागात पडेल,’ नवाब मलिक यांना फोनवरून धमकी, तत्काळ सुरक्षा वाढवली

लॉकडाऊनमध्ये पैसे मिळेना, तो साडी नेसून थेट किन्नर बनला, संधी मिळताच महिलांचे दागिने पळवायचा, अखेर सोलापुरातून बेड्या

(ncp leader rohit pawar claim that maharashtra bjp leaders hold meeting decided to attacks maha vikas aghadi leaders by ed cbi and it department)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI