AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…अन्यथा महागात पडेल,’ नवाब मलिक यांना फोनवरून धमकी, तत्काळ सुरक्षा वाढवली

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा कॉल आल्याचा धक्कादायक दावा केला जातोय. सातत्याने धकमीचे फोन कॉल्स येत असल्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराभोवतीदेखील आगावीचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

'...अन्यथा महागात पडेल,' नवाब मलिक यांना फोनवरून धमकी, तत्काळ सुरक्षा वाढवली
NAWAB MALIK
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 4:05 PM
Share

ठाणे : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचा कॉल आला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा महागात पडेल, असे या फोन कॉलमध्ये सांगण्यात आलेय. सातत्याने धकमीचे फोन कॉल्स येत असल्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराभोवतीदेखील आगावीचे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

सकाळी राजस्थानहून आला धमकीचा कॉल

नवाब मलिक यांनी एनसाबीचे विभागीय संचालक यांच्यावर खंडणीचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर एक नवी माहिती समोर येत आहे. मलिक यांना वेगवेगळ्या राज्यातून धमकीचे फोन येत आहेत. आज (22 ऑक्टोबर) सकाळी सात वाजता त्यांना धमकीचा फोन आला. नवाब मलिक यांच्या सुरक्षा रक्षकाने हा फोन कॉल उचलला होता.

वानखेडेंविरोधात बोलणं बंद करा अन्याथा…

नवाब मलिक यांना शुक्रवारी सकाळी राजस्थानहून एक निनावी फोन कॉल आला होता. या फोनकॉलामध्ये मलिक यांना धमकावण्यात आलं. समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणं बंद करा. अन्यथा महागात पडेल अशी धमकी या फोनकॉलच्या माध्यमातून देण्यात आली. दरम्यान, नवाब मलिक यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. याच कारणामुळे आता त्यांच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

नवाब मलिक यांचे समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांची बहीण जाम्सिन वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे, जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, असं मलिक यांनी म्हटलंय. तसेच समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार. वर्षभरात नोकरी जाईल. त्यांचा तुरुंगवास निश्चित आहे, असे आव्हानदेखील मलिक यांनी वानखेडे यांना दिले.

समीवर वानखेडे यांनी आरोप फेटाळून लावले

तर दुसरीकडे वानखेडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच देशसेवा करण्यासाठी तुरुंगात टाकले जात असेल तर मी स्वागत करतो. मला ते मान्य आहे, असेदेखील वानखेडे म्हणाले. विशेष म्हणजे माझ्या घरच्यांवर टीका केली जात आहे, हे चुकीचं असल्याचं मत वानखेडे यांनी व्यक्त केलंय.

इतर बातम्या :

आगीचे लोट दिसले अन् आम्ही धावतपळतच खाली आलो; अविघ्न पार्कच्या रहिवाश्यांनी सांगितली आँखो देखी!

गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

गोदाकाठच्या 100 मीटर परिसरात नो प्लास्टिक झोन; नाशिक महापालिकेचा निर्णय

(nawab malik received threatening calls from unknown person because of sameer wankhede allegations)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.