खडकमांजरीमध्ये 15 दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा, चार दिवस गावात अंधार, असं काय झालं की, गावातील दिवे पेटले

लोहा वीज वितरण कंपनीची अवकृपा झाली आणि ग्रामस्थाना अंधार राहावे लागले. लोहा वीज मंडळाचे उपअभियंता यांच्याबाबत तालुक्यातील जनतेच्या अनेक तक्रारी आहेत.

खडकमांजरीमध्ये 15 दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा, चार दिवस गावात अंधार, असं काय झालं की, गावातील दिवे पेटले
light
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 6:13 PM

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : उन्हाचा पारा वाढल्याने पंखा किंवा कुलरशिवाय राहवत नाही. शेताला विजेअभावी पाणी देता येत नाही. पण, वीजच नसेल, तर कसे करणार. गेल्या पंधरा दिवसांपासून गावात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. त्यामुळे त्रस्त झाल्याने गावकऱ्यांनी तक्रारी केल्या. वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतर गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला. लोहा शहराच्या जवळ असलेल्या कारेगाव शेवडी रस्त्यावरील खडकमांजरी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेची समस्या आहे. चार दिवसांपासून गावात लाईट नव्हती. गावात रात्रीही सगळीकडे अंधारच अंधार होता. याची माहिती मिळाल्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी वीज मंडळाच्या वरिष्ठांशी थेट संवाद साधला. गावात तात्काळ वीज पुरवठा व्हावा, असे सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी खडकमांजरी येथे वीज पुरवठा सुरळीत झाला.

लोहा वीज वितरण कंपनीची अवकृपा

लोहा वीज वितरण कंपनीची अवकृपा झाली आणि ग्रामस्थाना अंधार राहावे लागले. लोहा वीज मंडळाचे उपअभियंता यांच्याबाबत तालुक्यातील जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. सर्व सामान्य नागरिकांचे फोन उचलत नाहीत. कार्यालयात पूर्णवेळ राहत नाहीत, अशीच गत कनिष्ठ अभियंता यांची आहे.

तीन दिवसांपासून गाव अंधारात

या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होते. एखादे गाव दहा-दहा दिवस अंधार राहते. तरी तेथे वीज सुरळीत होत नाही. लाईनमॅन तर ग्रामस्थांना जुमानत नाहीत. रात्री फोन घेत नाहीत, असा तक्रारी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून खडकमांजरी हे गाव पूर्णतः अंधारात होते.

यांनी घेतला पुढाकार

गावातील माजी सरपंच पांडुरंग चौगुले, माजी चेअरमन खुशाल पाटील होळगे यांनी स्वतंत्रपणे याबाबत प्राणिताताई देवरे चिखलीकर यांना गावातील अंधाराबाबत सांगितले. त्यांनी तात्काळ वीज कंपनीच्या वरिष्ठांना खडकमांजरी येथील समस्या अवगत केल्या. रात्रीपर्यंत या गावात वीज सुरळीत झाली. गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.