Sangli Crime: सांगलीत दोन तरुणी आणि एका तरुणाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?

घटनास्थळी डोरमिक्स नावाची द्राक्षबागेवर फवारण्याचे विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.

Sangli Crime: सांगलीत दोन तरुणी आणि एका तरुणाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?
सांगलीत दोन तरुणी आणि एका तरुणाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 5:05 PM

सांगली : अज्ञात कारणावरुन दोन तरुणी आणि एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सांगलीतील तासगाव तालुक्यातील मणेराजुरीत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तिघांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हरीश हणमंत जमदाडे (24), प्रणाली उद्धव पाटील (19), शिवानी चंद्रकांत घाडगे अशी आत्महत्या केलेल्या तरुण तरुणींची नावे आहेत. हरीश जमदाडे आणि प्रणाली पाटील हे दोघे मणेराजुरीतील रहिवासी असून शिवानी घाडगे ही सांगोला तालुक्यातील हतीत गावची रहिवासी आहे.

मृतदेहांशेजारी विषारी द्रव्य सापडले

मृतदेहांशेजारी विषारी द्रव्य असलेली बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी घटनास्थळाचा पंचनामा करून नोंद करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी डोरमिक्स नावाची द्राक्षबागेवर फवारण्याचे विषारी द्रव्याची बाटली सापडल्याने ह्या आत्महत्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.

पोलीस तपासानंतरच सत्य समोर येईल

पोलीस या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. मृतदेहाजवळ सापडलेल्या चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार यामुळे या मृत्यूचे रहस्य अधिक वाढले आहे. हे तिघे जण काय करतात? गावाबाहेर इतक्या उंच डोंगरावर काय करीत होते? त्यांनी आत्महत्या का केली? तिघांचा एकमेकांशी संबंध काय? ही आत्महत्या आहे की हत्या? या सर्व बाजूंचा पोलीस तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येईल. (In Sangli, two girls and a youth committed suicide by drinking poisonous substance)

इतर बातम्या

Nagpur Crime | एक-दोन नव्हे तब्बल 8 गाड्या चोरल्या; कारण ऐकूण पोलीसही चक्रावले!

Kalyan Crime: बापाचे दारुचे व्यसन आणि आईच्या आजाराला वैतागून उचलले टोकाचे पाऊल, कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीतील हत्येचे रहस्य उलगले