Kalyan Crime: बापाचे दारुचे व्यसन आणि आईच्या आजाराला वैतागून उचलले टोकाचे पाऊल, कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीतील हत्येचे रहस्य उलगले

कल्याण पश्चिमेतील रामबाग परीसरातील निखिला हाईट्स या इमारतीत राहणारे सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन प्रमोद बनोरिया त्यांची पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश जखमी अवस्थेत आढळून आले होते. प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला होता.

Kalyan Crime: बापाचे दारुचे व्यसन आणि आईच्या आजाराला वैतागून उचलले टोकाचे पाऊल, कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीतील हत्येचे रहस्य उलगले
बापाचे दारुचे व्यसन आणि आईच्या आजाराला वैतागून उचलले टोकाचे पाऊल
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 4:32 PM

कल्याण : कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीतील हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आहे आहे. बापाचे दारुचे व्यसन आणि आई मानसिक रुग्ण असल्याने वैतागलेल्या मुलाने दोघांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. कल्याणमध्ये 10 डिसेंबर रोजी आई वडिलांना मारुन स्वत: जखमी झालेला तरुण लोकेशला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण पश्चिमेतील रामबाग परीसरातील निखिला हाईट्स या इमारतीत राहणारे सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन प्रमोद बनोरिया त्यांची पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश जखमी अवस्थेत आढळून आले होते. प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर आई कुसुम ही गंभीर जखमी होती. वडिलांनी मला व आईला जखमी करुन स्वत: आत्महत्या केली आहे, अशी माहिती लोकेशने प्राथमिक तपासात पोलिसांना दिली होती. मात्र लोकेशच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास नव्हता. पोलिसांनी जखमी आई कुसुम आणि लोकेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

वडिलांचे व्यसन आणि आईच्या आजारामुळे नैराश्येतून मुलाने केले कृत्य

डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. गंभीर जखमी असलेल्या लोकेशच्या आईने पोलिसांनी सांगितले होते की, लोकेश खोटे बोलतो. त्यानेच आम्हाला मारहाण केली आहे. जखमी केले आहे. काही दिवसानंतर कुसुमचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचार सुरु असलेल्या लोकेशची प्रकृती स्थित झाल्यावर पोलिसांनी त्याची विचारपूस केली. यावेळी आपणच आई वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. वडिलांना दारुचे व्यसन होते. ते दिवस रात्र दारु पित होते, तर आई मानसिक रुग्ण होती. त्यामुळे तो वैतागला होता. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. या नैराशातून त्याने हे कृत्य केले.

सुरक्षारक्षकाला अॅम्बुलन्स आणायला सांगितल्यानंतर घटना उघड

लोकेशने 10 डिसेंबर रोजी पहाटे इमारतीच्या सुरक्षारक्षाला फोन करुन अॅम्बुलन्स बोलाण्यास सांगितले. मात्र सुरक्षारक्षकाला बनोरिया यांच्या घरी काहीतरी संशयास्पद वाटले म्हणून त्याने सोसायटीतील लोकांना याबाबत सांगितले. त्यानुसार सोसायटीतील लोकांनी बनोरिया यांच्या घरी जाऊन पाहिले असता, घरातील तीनही सदस्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर सोसायटीच्या लोकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला. (The son killed his parents due to his father’s alcoholism and mother’s illness)

इतर बातम्या

Pimpri Murder | अकरावीतील विद्यार्थ्याच्या हत्येचं गूढ उकललं, WhatsApp स्टेटसमधून खुन्नस दिल्याने चुलतभावाकडून खून

Wardha Crime: उपचारासाठी गेलेल्या महिलेचे दागिने लंपास, सेवाग्राम रुग्णालयातील प्रकार, सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल

Non Stop LIVE Update
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.