टेंभू आणि म्हैसाळचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार, आर.आर. पाटील यांचं स्वप्न पूर्ण होणार: जयंत पाटील

सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्याला पाणी मिळण्यासाठी स्वर्गीय आर. आर.पाटील हे प्रयत्न करत होते. या दुष्काळी तालुक्यात आज पाणी पोहचले आहे.

टेंभू आणि म्हैसाळचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार, आर.आर. पाटील यांचं स्वप्न पूर्ण होणार: जयंत पाटील
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सांगली: संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच काम आहे. स्वर्गीय आर. आर .पाटील यांच्या काळात टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनाचे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच स्वप्न आज पूर्णत्व कडे जात आहे, असं जंयत पाटील म्हणाले. आज सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मध्ये आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्याला पाणी मिळण्यासाठी स्वर्गीय आर. आर.पाटील हे प्रयत्न करत होते. या दुष्काळी तालुक्यात आज पाणी पोहचले आहे. कवठेमहांकाळ भागातील 13 गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. तर उर्वरित काही भागात ही पाणी पाहोचेल. असेही पाटील म्हणाले.

टेंभू योजना नेमकी काय?

दुष्काळी भागाला पाणी मिळावं म्हणून पाण्याचा लढा 1993 पासून सुरु झाला होता. त्यानंतर 1996 मध्ये टेंभू उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकांळ, तासगाव, खानापूर, जत, मिरज, सातारा जिल्ह्यातील माण खटाव अशा 13 तालुक्यांना या योजनेतून पाणी मिळणार होते. तेव्हापासून या योजनेत अनेक गावांचा समावेश करण्यात आला पण अद्यापही टेंभू योजनेचे का पूर्णत्वास पोहोचलेलं नाही.

म्हैसाळ योजना

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालेलं आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे मिरज, कवठेमहाकांळ, तासगाव आणि जत तालुक्यातील गावां पाणी दिलं जातं. म्हैसाळ धराणातून पाणी उपसून दुष्काळी भागाला दिलं जातं.

दुष्काळी बागाला 1.5 टीएमसी पाणी उचलून देणार

टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला या तालुक्यासाठी 1.5 टीएमसी पाणी उचलण्यात येणार असून साधारणतः 74 लघु प्रकल्प भरले जाणार आहेत. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यासाठी अंदाजे 2 टीएमसी पाणी उचलण्यात येणार असून साधारणतः 150 लघु प्रकल्प आणि साठवण तलाव भरले जाणार आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले होते. सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, जत, मंगळवेढा, सांगोला या तालुक्याना कृष्णा नदीतील चालू पावसाळी हंगामातील अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळी भागात दिले जाणार आहे. हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील काळात उपयुक्त ठरणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या:

आपण निसर्गाशी खेळ केला म्हणूनच बिबट्या, मगरींचा शहरात संचार; जयंत पाटलांनी दिला सावधानतेचा इशारा

जतसाठी 6 टीएमसी पाणी, जलसंपदामंत्र्याचा निर्णय, जतवासियांकडून जयंत पाटलांचं धुमधडाक्यात स्वागत

Jayant Patil said water of krishna river will reach to drought hit area dream of R R Patil came in truth

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI