जतसाठी 6 टीएमसी पाणी, जलसंपदामंत्र्याचा निर्णय, जतवासियांकडून जयंत पाटलांचं धुमधडाक्यात स्वागत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वंचित 67 गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी वारणा धरणातून सहा टीएमसी पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांचे रविवारी जत तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले.

जतसाठी 6 टीएमसी पाणी, जलसंपदामंत्र्याचा निर्णय, जतवासियांकडून जयंत पाटलांचं धुमधडाक्यात स्वागत
जतवासियांकडून जयंत पाटील यांचं धुमधडाक्यात स्वागत
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 11:01 AM

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वंचित 67 गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी वारणा धरणातून सहा टीएमसी पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील (Jayant Patil) यांचे रविवारी जत तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले.

मंत्री जयंत पाटील रविवारी जत दौऱ्यावर आले होते. त्यांचा राष्ट्रवादी व तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. धावडवाडी, कुंभारी, जत, वळसंग, माडग्याल, सोण्याळ फाटा, उटगी येथे जयंतरावांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं.

राजारामबापूंचा शब्द पूर्ण करणं माझं कर्तव्य

राजारामबापूंनी जत तालुक्यातील जनतेला पाणी देण्याचा दिलेला शब्द , त्यांचा मुलगा म्हणून तो पूर्ण करणे हे माझे कर्तव्य होते. त्याचे पहिले पाऊल म्हणून वारणा धरणातून सहा टीएमसी पाण्याची उपलबता झाली आहे. आता ही योजना अडीच वर्षात मार्गी लावू, असं ठोस आश्वासन जयंतराव पाटील यांनी जतवासियांना दिलं.उमदी येथे 65 गावांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे यावर वर्षभर एका कमिटीच्या माध्यमातून आभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला. आपल्याच राज्यातून हक्काचे व कायमस्वरूपी पाणी देणे सोयीचे ठरणार आहे. म्हैसाळ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातून पाणी उचलून दोन ठिकाणी लिफ्ट केले जाईल. सहा टीएमसी पाणी जत तालुक्यात हे पाणी चार वितरीकेच्या माध्यमातून सुमारे 50 हजार एकर क्षेत्राला लाभ देता येईल.

योजनेला राजाराम बापूंचं नाव देण्याचा ठराव, उपस्थितांचं टाळ्यांच्या गजरात अनुमोदन

अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, राज्यातील एक आदर्शवत अशी ही योजना म्हणून पूर्ण करून घेऊ. यावेळी होर्तिकर वकील यांनी या योजनेस स्व.राजाराम बापू पाटील असे नाव देण्याचा ठराव मांडला, त्याला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून व बापूंचा जयघोष करून अनुमोदन दिले.

(6 TMC water for Jat, decision of Water Resources Minister Jayant Patil)

हे ही वाचा :

आपण निसर्गाशी खेळ केला म्हणूनच बिबट्या, मगरींचा शहरात संचार; जयंत पाटलांनी दिला सावधानतेचा इशारा

राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले, पण उद्धव आले नाहीत; ‘तो’ किस्सा सांगताना आशिष शेलार भावूक

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.