Jayant Patil: सगळ्यांना हाणलं नाही तर…सांगलीतील बॅनरची राज्यभर चर्चा, कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला?

Jayant Patil Sangli: नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने अनेकांना अनपेक्षित धक्का दिला आहे. निवडणुकीत रणधुमाळीत जिव्हारी लागणारी टोलेबाजी करण्यात आली. तर निकालानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. असाच कलगीतुरा आता सांगलीत रंगला आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या बॅनरची राज्यभर चर्चा सुरू आहे.

Jayant Patil: सगळ्यांना हाणलं नाही तर...सांगलीतील बॅनरची राज्यभर चर्चा, कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला?
जयंत पाटील यांच्या बॅनरची मोठी चर्चा
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Dec 23, 2025 | 10:11 AM

Jayant Patil Banner: राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे दम बडा आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,” या त्यांच्या गाजलेल्या आव्हानाची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालातून आली आहे.याचेच पोस्टर ईश्वरपूर मध्ये लागले आहेत. त्याची एकच चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे.

विरोधकांची हवाच काढली

सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपासह महायुतीने तगडी फिल्डिंग लावली होती. दिग्गज नेत्यांची फौज आणि रणनीती आखून पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. तर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २३ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांची अक्षरशः हवा काढून घेतली.

सगळ्यांना हाणलं नाही तर…

विजयानंतर ईश्वरपूर शहर आणि राजारामबापू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावले आहेत. यावर जयंत पाटील यांचे “सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही” हे वाक्य मोठ्या अक्षरात झळकत आहे.हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरची शहरभरच नाही तर राज्यभर चर्चा सुरू आहे. या निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सभेतील शिवराळ भाषेतून केला होता. त्याला आता पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरमधून उत्तर दिलं आहे.

प्रतिक पाटलांचा शड्डू

सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीची टीम ईश्वरपूर मध्ये उत्तरली होती. तर जयंत पाटील यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभा घेतली होती.मात्र जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवल्यानंतर ईश्वरपूर मध्ये एकच जल्लोष करण्यात आला यावेळी स्वतः हा जयंत पाटील आणि त्याचे पुत्र प्रतिक पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या ठिकाणाहून शड्डू ठोकला.तर जयंत पाटील यांनी आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन विजयाचा जल्लोष साजरा केला. त्याचीही मोठी चर्चा झाली.

देवा भाऊ म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली देणगी

देवा भाऊ म्हणजे महाराष्ट्रला मिळालेली देणगी आहे. भाजपचे काम लोकांना कळू लागले आहे त्यामुळे सांगली नव्हे तर महाराष्ट्रभर भाजपाला भरभरून यश मिळत आहे.जत आणि आटपाडी मध्ये यश मिळवल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली. सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी नगरपंचायतीमध्ये अंधार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले आहे.यावेळी दोन्ही तालुक्यात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांनी या विजयानंतर प्रतिक्रिया दिली भाजपाचे काम बोलतं. लोकांना ते कळू लागल आहे.त्यामुळे सांगली नव्हे तर महाराष्ट्रभर भाजपाला भरभरून यश मिळत आहे. अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.