कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडीत मुसळधार पाऊस, ओढे-नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत (गेल्या चोवीस तासात) 143.55 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी येथे पडला. (Konkan Sindhururg Heavy Rain Update)

कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडीत मुसळधार पाऊस, ओढे-नदी-नाले दुथडी भरुन वाहू लागले
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग :  काल (मंगळवार) दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पहाटेपासून जोर धरला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत  (गेल्या चोवीस तासात) 143.55 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी येथे पडला. सावंतवाडीत 172 मिलिमीटर एवढ्या पावसाची  नोंद झाली. (Konkan Sindhururg Heavy Rain Update)

सिंधुदुर्ग जिल्हयात सर्वत्र दमदार पाऊस

1 जूनपासून आजपर्यंत पडलेल्या पावसाची एकूण सरासरी 766 मिलीमीटर एवढी आहे. सर्वत्र दमदार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात जोरदार सरी कोसळत आहेत. नदी किनारी राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तीन दिवस मुसळधार पडलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून अनेक रस्ते व शेती पाण्याखाली गेली आहे.

होडावडा मार्गाने होणारी वाहतूक बंद, भंगसाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली

जिल्ह्यात सकाळ पासून पावसाच्या मोठ-मोठ्या सरी कोसळत असून अनेक ठिकाणी नद्यांना पुर आला आहे. वेंगुर्ले येथील होडावडा पुलावर पाणी आल्याने होडावडा मार्गाने होणारी वाहतूक बंद झाली आहे तर कुडाळ येथील भंगसाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर सकल भागात पाणी साचल्याने वाहतूकीला अडथळा येत आहे. तर जिल्ह्यात काही भागात विद्युतपुरवठा देखील खंडित झाला आहे.

कणकवलीत कोसळधार, 3 दिवसांत 342 मिमी पाऊस

कणकवलीत आज पहाटे पासून मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे शहरातील रामेश्वर प्लाझा या इमारतीत पहाटेच्या सुमारास पाणी शिरले. साखर झोपेत असताना पाणी शिरल्यामुळे रहिवाशांची मोठी धांदल उडाली. पार्किंग मध्ये शिरलेलं पाणी हळूहळू तळमजल्यावरील घरात पोचले. अखेर सकाळी सातच्या सुमारास पाणी हळूहळू ओसरले. मात्र या पाण्यामुळे अनेक वस्तूंचे नुकसान झाले. कणकवलीत मागील तीन दिवसात सरासरी 342 मिमी पाऊस पडला आहे. आज पहाटे पासून मुसळधार पडलेल्या पावसाने 11 नंतर विश्रांती घेतली.

(Konkan Sindhururg Heavy Rain Update)

हे ही वाचा :