MHT-CET: सीईटीत महाघोटाळ्याचा आरोप, धक्कादायक ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ, धागेदोरे कुठपर्यंत? थेट…

MHT-CET 2026 Viral Audio Clip: NEET पेपरफुटीनंतर MHT-CET मध्येही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना बारावीला जेमतेम 35-40 टक्के गुण मिळाले. त्यांना एमएच-सीईटी परीक्षेत 90-100 पर्सेंटाईल्स कसे पडले असा सवाल विचारला जात आहे. त्याचवेळी परभणीमधून याविषयीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्याने खळबळ उडाली आहे.

MHT-CET: सीईटीत महाघोटाळ्याचा आरोप, धक्कादायक ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ, धागेदोरे कुठपर्यंत? थेट...
सीईटीत महाघोटाळ्याचा आरोप, धक्कादायक ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ
| Updated on: Jul 28, 2026 | 11:19 AM

MHT-CET 2026 Viral Audio Clip: राज्यात MHT-CET मध्येही महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावीला जेमतेम 35-40 टक्के गुण मिळाले. त्यांना एमएच-सीईटी परीक्षेत 90-100 पर्सेंटाईल्स कसे पडले असा सवाल केल्या जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याविषयीचा आरोप केला. त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दोषींना शिक्षेची मागणी केली आहे. तर त्याचवेळी इंजिनिअरिंग सीईटी संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. TV9 मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिप ची पुष्टी करत नाही.

इंजिनिअरिंग सीईटीसंदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप

परभणी येथून इंजीनियरिंग सीईटी संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. विशिष्ट परीक्षा केंद्र उपलब्ध करून, चांगले मार्क मिळवून देण्याचा ऑडिओ क्लिपमध्ये दावा केला जात आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळवून दिले असल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात आला आहे. 13 लाखांमध्ये चांगले मार्क मिळवून देत, सीओईपी, व्हीजेटीआय सारख्या नामांकित कॉलेजमध्ये, प्रवेश मिळून देणार असल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये केला जात आहे.

त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय संवाद?

अज्ञात पालक : सर, तुम्ही माझ्या मुलाबाबत काय बोलत होते, 90 पडू शकतात.

पैशांची मागणी करणारी व्यक्ती : हो हो, एमएचटी-सीईटीमध्ये नाही का तुम्हाला जे कॉलेज हवं असेल ना तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना. त्या क्रायटेरियामद्ये तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथं सीट मिळतं. राईट?

अज्ञात पालक : हो.

पैशांची मागणी करणारी व्यक्ती : सो आपण नाही का आपली काही सेंटर असतात एक्झाम सेंटर, त्या एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागते. तर आपण त्याला बॅक करून त्यामध्ये एलिजिबल करून देऊ शकतो मॅम.

अज्ञात पालक : हा पण हे कसं शक्य होईल, सर?

पैशांची मागणी करणारी व्यक्ती : हे बघा तुम्हाला आधी पैसे पे करायचे नाही, मॅम.

अज्ञात पालक : हा

पैशांची मागणी करणारी व्यक्ती : तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ॲडमिशन होईल. त्यानंतर पे करायचे आहे.

अज्ञात पालक : हा

पैशांची मागणी करणारी व्यक्ती : असं नाही की तुमच्याकडून आधी पैसे घेतायेत.

अज्ञात पालक : सर याची अमाऊंट किती पे करावे लागतील.

पैशांची मागणी करणारी व्यक्ती : बघा टॉप थ्री जर गव्हर्मेंट कॉलेज घेऊन चलाल तुम्ही जसं की व्हिजीटीआय, सीओईपी, सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 ला मध्ये करून देऊ शकतो बघा. ते पण ॲडमिशननंतर पे करायचे आहेत.

अज्ञात पालक : हा, पण हे कसं शक्य होईल सर.

पैशांची मागणी करणारी व्यक्ती : हे बघा. तुम्हाला आधी पैसे पे करायचे नाहीत मॅम. तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल. ॲडमिशन होईल. त्यानंतर पे करायचे आहे.

सोशल मीडिया व्हिडिओविरोधात तक्रार

CET निकालात अनियमितता झाल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया व्हिडिओंवरून CET सेलने तक्रार दाखल केली. आझाद मैदान पोलीस आणि राज्य सायबर विभागाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण असूनही CET मध्ये 99 ते 100 पर्सेंटाइल मिळाल्याचा दावा व्हिडिओंमध्ये करण्यात आला आहे. लाच देऊन उच्च गुण मिळवल्याचाही आरोप काही व्हिडिओंमध्ये करण्यात आला आहे. CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी हे दावे दिशाभूल करणारे असल्याचे सांगत निकाल प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला आहे.

भाजप नगरसेवकाच्या जुळ्या मुलांना एमएचटीसीईटीमध्ये 99 टक्के गुण, पालकाचा बोलण्यास नकार

एमएचसीईटीच्या परीक्षेत ही गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस कडुन केला जातोय. नांदेड येथील भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना अनुक्रमे 99 टक्के गुण इंजिनियरिंग प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमएचटीसीईटी परीक्षेत मिळाले असून त्यांना बारावी मध्ये पीसीएम ग्रुपमध्ये केवळ 56 टक्के आणि 51 टक्के होते. तर jee परीक्षेत 51% आणि 28 % गुण मिळाले होते. पण एमएच-सीईटी परीक्षेमध्ये मात्र त्याना 99% गुण मिळाले असल्याचा दावा काँग्रेसचे नेते बालाजी गाढे यांनी केलाय. भाजपचे नांदेडचे पदाधिकारी तथा नगरसेवक आशिष नेरळकर यांना जुळे मुलगा आणि मुलगी आहे. अवनी आणि आरुष अशी त्यांची नावं असून बारावी मध्ये आणि jee परीक्षेमध्ये मार्कांची एवढी तफावत असताना एमएस-सीईटी परीक्षेत अनुक्रमे 99% कसे गुण मिळालेत असा सवाल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याबाबत नगरसेवक आशिष नेरळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो असता त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us