Latur Crime : मुलासमोरच पित्याकडून आईच्या हत्येचा थरार…न्यायालयात मुलाच्या साक्षीने शिक्षा

Latur Crime : मुलासमोरच पित्याकडून आईच्या हत्येचा थरार...न्यायालयात मुलाच्या साक्षीने शिक्षा
लातूर जिल्हा व सत्र न्यायालय
Image Credit source: TV9 Marathi

संशय माणसाच्या मनात शिरल्यावर किती कल्लोळ करतो आणि त्याचे परिणाम काय होतात याचा प्रत्यय लातूरातील एका घटनेवरुन समोर येत आले आहेत. चारित्र्याच्या संशयावरुन 8 वर्षाच्या मुलासमोरच धारदार शास्त्राने पत्नीचा गळा चिरुन पतीने हत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील तुंगी येथे नोव्हेंबर 2018 मध्ये घडली होती. अखेर चार वर्षानंतर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.विशेष म्हणजे सदरील आरोपीला त्याच्याच 8 वर्षाच्या मुलाच्या साक्षीने ही शिक्षा सुनावण्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 26, 2022 | 12:53 PM

लातूर : संशय माणसाच्या मनात शिरल्यावर किती कल्लोळ करतो आणि त्याचे परिणाम काय होतात याचा प्रत्यय लातूरातील एका घटनेवरुन समोर येत आले आहेत. चारित्र्याच्या संशयावरुन 8 वर्षाच्या मुलासमोरच धारदार शास्त्राने पत्नीचा गळा चिरुन पतीने हत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील तुंगी येथे नोव्हेंबर 2018 मध्ये घडली होती. अखेर चार वर्षानंतर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.विशेष म्हणजे सदरील आरोपीला त्याच्याच 8 वर्षाच्या मुलाच्या साक्षीने ही शिक्षा सुनावण्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेचा मुख्य साक्षीदार हा आरोपीचा मुलगाच होता. या प्रकरणी 10 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आली पण प्रत्यदर्शी असलेल्या मुलाचीच साक्ष ही महत्वाची मानली गेली.

नेमके प्रकरण काय ?

औसा तालुक्यातील तुंगी येथे महेबूब हुसेन मुळजे (25) व त्याची पत्नी साबिया यांच्यामध्ये सातत्याने भांडण होत होते. चारित्र्याच्या संशयावरुन महेबूब हा पत्नीला मारहाण करीत होता. असा प्रकार 1 नोव्हेंबर 2018 मध्ये सकाळी या दोघांमध्ये मुलाच्या समोरच भांडण लागले. भांडण एवढ्या टोकाला गेले की महेबूब याने धारधार चाकुने गळा चिरुन पत्नीची हत्या केली. हा सर्व प्रकार त्यांच्या मोठ्या मुलाच्या डोळ्यासमोरच झाला होता. याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

10 जणांमध्ये मुलाची साक्षच ठरली महत्वाची

दरम्यान, लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेल्या 4 वर्षापासून सुनावणी सुरु होती. यामध्ये 10 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. मयत साबिया आणि महेबूब यांचा मोठा मुलगा याचीच साक्ष महत्वाची ठरली असून सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी महेबूब हुसेन मुळजे यास मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

4 वर्षानंतर मिळाली शिक्षा

1 नोव्हेंबर 2018 मध्ये तुंगी येथील राहत्या घरी पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. पती महेबूब हा सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच हा वाद विकोपाला पोहचला. मात्र, डोळ्यादेखत आईचा मृत्यू आणि आपल्याच साक्षीने वडिलांना शिक्षा अशी दुर्देवी वेळ 8 वर्षाच्या मुलावर आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी काम पाहिले. तब्बल चार वर्षानंतर या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Video Photo: पोरगी टल्ली झाली, मुंबई पोलीसांची गच्ची पकडली, मद्यधूंद झालेल्या पोरीचा रस्त्यावर राडा

IPL 2022: CSK चा 36 वर्षीय खेळाडू वानखेडेवर KKR वर पडणार भारी, टीम जडेजाचं पारडं जड

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सने कारला नेले फरफटत; तिहेरी अपघातात 1 ठार, 2 गंभीर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें