AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमावस्येला दारात लिंबु-हळदकुंकू आणि बांगड्या,घरातील वस्तूंना अचानक आग, रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट

अहिल्यानगरातील राहुरीत एका घरात अचानक कपडे पेटणे, घरासमोर लिंबू मिरच्या टाकण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

अमावस्येला दारात लिंबु-हळदकुंकू आणि बांगड्या,घरातील वस्तूंना अचानक आग, रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट
black magic
| Updated on: May 18, 2026 | 7:16 PM
Share

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे जादूटोणा आणि भानामतीच्या संशयाने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कारवाडी परिसरात एका घरात कपडे, कागदपत्रे आणि इतर वस्तूंना अचानक आग लागत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.अमावस्येच्या रात्री घरासमोर लिंबू-मिरचीसह काही संशयास्पद वस्तू आढळल्याने जादूटोण्याची चर्चा रंगली आहे.सचिन रणधीर आणि साईनाथ रणधीर यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अचानक वस्तूंना आग लागत असल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातही नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

सचिन रणधीर यांच्या घरात मागेही साल २०२२ मध्ये असेच भानामतीचे प्रकार घडले होते. त्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर अनाप यांना पाचारण केले होते. त्यांनी त्यांना घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर अनेक वर्षे असे प्रकार थांबले होते. आता पुन्हा त्यांच्या घरातील कपडे आपोआप पेटणे आणि शनिवारी अमावस्येला घराच्या दारात लिंबू मिरच्या टाकण्याचा प्रकार घडल्याचे सचिन रणधीर यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे ते घाबरुन गेले आहेत.त्यांच्या घरातील या अजब प्रकारामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

वैज्ञानिक कारणांचा शोध घेणे आवश्यक

संबंधित घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. त्यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे. कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक घटनेमागे कारण असते. तसेच कपडे पेटणे वगैरे घटनांना वैज्ञानिक कारण असते. या कपड्यांवर केमिकल किंवा काही रासायनिक पदार्थ लपवलेले असू शकतात. त्यामुळे उष्णतेने हे पदार्थ पेटत असावेत. या मागे कोणताही भानामती वगैरे प्रकार नाही. जर कोणी असा दावा करत असेल तर अंधश्रद्धा निर्मुलन समिती त्याला २१ लाखांचे बक्षिस देते असेही त्यांनी सांगितले. या प्रकारामागील वैज्ञानिक कारणांचा शोध घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहनही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...