भाजपमध्ये काय दुधानं धुतलेली लोकं आहेत का? ईडी सीबीआयचा गैरवापर होतोय,नाना पटोलेंचा आरोप

शाहिद पठाण

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 9:29 PM

जे लोक भाजप विरोधात आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय लावले जाते. मात्र, भाजपमध्ये काय दुधाने धुतलेली लोक आहेत काय? त्यांच्यावर काय भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.

भाजपमध्ये काय दुधानं धुतलेली लोकं आहेत का? ईडी सीबीआयचा गैरवापर होतोय,नाना पटोलेंचा आरोप
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

गोंदिया: अनिल देशमुख प्रकरणात ईडीने सर्व सर्व विमानतळ प्राधिकरण यांना अनिल देशमुख यांच्या बाबत नोटिसा बजावल्या या संदर्भात विचारलं असता नाना पटोले यांनी भाजपकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप केला. नाना पटोले म्हणाले की अनिल देशमुखांसदर्भातील आदेश या कायदेशीर बाबी आहेत. मात्र,जे लोक भाजप विरोधात आहेत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय लावले जाते. मात्र, भाजपमध्ये काय दुधाने धुतलेली लोक आहेत काय? त्यांच्यावर काय भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. जर उद्या राज कुंद्रा भाजपात गेले तर ते व्हिडिओ रामायणाचे आहेत काय असे भाजप म्हणणार आहे काय? कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. जर भाजपचा विरोध केला म्हणून जर या स्वायत्त संस्थेचा जर कोणी वापर करत असेल तर हे चुकीचे आहे, असं नाना पटोले म्हणाले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको

महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव घातला आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे, यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की जो संविधानिक अधिकार ज्या समाजाचा आहे तो त्याला मिळायला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने सुद्धा तोच प्रयत्न केला आहे. भाजप सरकारने ओबीसी आरक्षण कमी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही ओबीसींना आरक्षण मिळू नये याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी कडून काँग्रेसची भूमिका आरक्षणाशिवाय निवडणूक होणार नाही, अशी असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. केले.

महिलेला मारहाण करणं चुकीचे

पुणे जिल्ह्यातील महिला सरपंचावर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याकार्यकर्ता मारहानी प्रकरणावर बोलताना नाना पटोले म्हणाले की ही बाब त्या पक्षाच्या संस्कृती वर अवलंबून आहे. पण,जर कोणताही पक्ष कार्यकर्ता असे करीत असेल तर त्यांचा विरोध केला पाहिजे. या प्रकरणावर पुणे येथे गेल्यावर माहिती घेतो,अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

इतर बातम्या:

केडीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदेंची माहिती

वसंतदादा पाटलांचं काय झालं?, पवारांवर आता पुस्तकच यायचं बाकी; चंद्रकांतदादांचा पलटवार

राज ठाकरे म्हणतात, ओबीसींच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव; चंद्रकांतदादा म्हणाले, राज म्हणतात ते बरोबर!

Nana Patole slam BJP alleges they misuse ED and CBI on opposition party leaders

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI