नाना पटोले यांची भाजपावर घणाघाती टीका, पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे.

नाना पटोले यांची भाजपावर घणाघाती टीका, पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा
नाना पटोले म्हणतात, असत्यरुपी राक्षसावर विजय मिळवा
Image Credit source: ANI
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 28, 2022 | 10:35 PM

गणेश सोनोने, Tv 9 मराठी प्रतिनिधी, अकोला : स्त्री हे दुर्गेचे रूप आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या रुपात या महागाईच्या भस्मासुर रुपी भाजपाचा वध करा. असे उद्गार नाना पटोले यांनी काढले. यावेळी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या विळे वाटपाच्या कार्यक्रमात नाना पटोलेंनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. महिषासुर राक्षस त्या काळात मानवी जीवनाला अत्यंत त्रास द्यायचा. त्यामुळे दुर्गेने जन्म घेऊन असत्यरुपी राक्षसवर विजय मिळविला जातो. सत्याचा असत्यावर विजय मिळविल्याने नवरात्रोत्सव साजरा केल्या जातो.

आता आपल्यावर पुन्हा असत्य म्हणजे महागाई राज्य करत आहे. ती महागाई मोदी सरकारने आणली आहे. या महागाईवर विजय मिळवायचा असेल तर तुमच्या मतदानातून भाजपला पुढील निवडणुकीत दाखवून द्या. असे आवाहन नाना पटोले यांनी अकोल्यातील गांधीग्राम येथे एका कार्यक्रमात केले आहे.

महागाईचा आलेख वाढतोय

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भावही सामान्यांच्या हाताबाहेर गेले आहेत.

गॅसचा भाव सातत्याने वाढवून आता तो 1 हजार 100 रुपये झाला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात हाच गॅस सिलिंडर 350 रुपयांना मिळत होता, असेही नाना पटोले म्हणाले.

महागाईच्या भस्मासुराचा वध करा

अकोला जिल्ह्यातल्या गांधीग्राम येथील विळे वाटपाच्या कार्यक्रमांमध्ये नाना पटोले म्हणाले की, आत्ताच तुम्हाला विळे वाटप करण्यात आले आहेत. तुम्हीसुद्धा दुर्गेचे रुप आहात. मात्र या विळ्याने कोणाला कापायचे नाही.

तुमच्या मतदानाने महागाईच्या भस्मासुराचा म्हणजे भाजपाचा वध करा, असे आवाहन यावेळी केले आहे. अकोला ते अकोट रोडवरील गांधीग्राम येथील एका शेतात विळे वाटपाचा कार्यक्रमावेळी नाना पटोले बोलत होते.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें