Nanded | खासगी बसची दुचाकीला जोरदार धडक, गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू, नांदेडमध्ये भीषण घटना!

खाजगी बसने दिलेल्या धडकेत जी गर्भवती महिला ठार झाली, तिचं नाव इंदूबाई डांगे असं होतं. इंदूबाई डांगे आणि त्यांचे पती नांदेड येथून त्रिकूटकडे जात होत्या.

Nanded | खासगी बसची दुचाकीला जोरदार धडक, गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू, नांदेडमध्ये भीषण घटना!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 5:08 PM

नांदेडः शहराजवळच्या माळटेकडी भागात एक भीषण अपघात (Terrible Accident) घडला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी बसने (Private bus) दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गर्भवती महिला (Pregnant Woman) गंभीर जखमी झाली. तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की धडक दिल्यानंतर दुचाकीचा चक्काचूर झाला. या घटनेत गर्भवती महिलेच्या पतीलाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच आणखी दोघांनाही या घटनेत इजा झाली असून त्याच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माळटेकडी परिसरात अपघात

खाजगी बसने दिलेल्या धडकेत जी गर्भवती महिला ठार झाली, तिचं नाव इंदूबाई डांगे असं होतं. इंदूबाई डांगे आणि त्यांचे पती नांदेड येथून त्रिकूटकडे जात होत्या. हा अपघात नेमका कसा झाला, ही माहिती अद्याप समोर आली नाही. पण खासगी बसने दुचाकीला धडक दिल्याने ही घटना घडली. अपघात घडल्यानंतर रस्त्यावरील अनेकजण मदतीसाठी धावले. मात्र गर्भवती महिला बसच्या धडकेने खाली कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र इतर जे गंभीर जखमी होते, त्यांना प्रत्यक्षदर्शींनी लवकरात लवकर रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.

बीड़मध्ये अपघातात पती-पत्नी ठार

बीडमधील पाटोदा गावाजवळ वांजरा फाटा येथे कारला भीषण अपघात झाला. कारमध्ये उस्मानाबादमधील भूम येथील रहिवासी अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी होते. अपघातानंतर हे दोघेही जागीच ठार झाले. तर आणखी एका गंभीर जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.